आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष: रामदेवबाबांना महापालिका देणार मानपत्र, सभेत प्रस्ताव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- उजनी ते सोलापूर नवीन दुहेरी जलवाहिनी घालण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्तांनी तयार केला असून, तो सभागृहापुढे मान्यतेसाठी आला आहे. त्यास मान्यता देण्यात येईल. माझ्या कार्यकाळात दुहेरी जलवाहिनीचे काम व्हावे, अशी इच्छा असल्याचे महापौर शोभा बनशेट्टी म्हणाल्या. योगगुरू रामदेवबाबा पुढील महिन्यात सोलापुरात येणार असून, त्यांना महापालिकेच्या वतीने मानपत्र देऊन सत्कार करण्याचा प्रस्ताव भाजप व शिवसेनेच्या वतीने तयार करण्यात आला आहे. 


महापालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी सकाळी ११ वाजता महापौर बनशेट्टी यांनी बोलावली आहे. त्यासाठी पुरवणी विषय नगरसचिव कार्यालयात आले आहेत. त्यात उजनी ते सोलापूर दुहेरी जलवाहिनीचा प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव एकमताने करण्याचा प्रयत्न असेल, असे महापौर बनशेट्टी म्हणाल्या. शहरासाठी नवीन दुहेरी जलवाहिनीची गरज आहे. त्याशिवाय शहरात पाणीपुरवठा सुधारणा होेणार नाही. एनटीपीसीकडून २५० कोटी तर स्मार्ट सिटीतून २०० कोटी आणि शासनाकडून २५० कोटी मदत घेऊन योजना पूर्ण करणार असल्याचे महापौर बनशेट्टी म्हणाल्या.दुहेरी जलवाहिनी झाल्यास मी पालकमंत्री व सहकारमंत्री यांचा जाहीर सत्कार करेन, अशी वाच्यता काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक अॅड. यू. एन. बेरिया यांनी केली होती. महापालिका प्रशासनाने प्रस्ताव दिला असून, आम्ही ते मंजूर करून लवकरच मक्ता काढण्यात येईल. त्यामुळे अॅड. बेरिया यांनी हार तयार ठेवावे, असे महापौर बनशेट्टी म्हणाल्या. 


पालिकेने यापूर्वी या मान्यवरांना दिले मानपत्र 
महापालिकेकडून यापूर्वी गायिका लता मंगेशकर, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, सुशीलकुमार शिंदे आदींचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. सचिन तेंडूलकर यांनी क्रिकेटमध्ये विश्वविक्रम केला तर सिनेअभिनेते दिलीप कुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला. यामुळे यांना मानपत्र देण्याचा ठराव झाला. तेंडुलकर आणि दिलीप कुमार आले नाहीत. त्यामुळे त्यांना मानपत्र दिले गेले नाही.

 
सभागृह नेत्याबाबत निर्णय नाही
दोन देशमुखांचे मनोमिलन झाले असले तरी शुक्रवारी होणाऱ्या मनपा सभागृहात सूचना कोण वाचणार याबाबत अद्याप निर्णय झाला नाही. पक्षाकडून निर्णय अपेक्षित आहे, असे महापौर बनशेट्टी म्हणाल्या. 

बातम्या आणखी आहेत...