आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतीच्या वादातून भाच्यासह दोघांनी केला मामाचा खून; गुप्तांगावर केली मारहाण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवेढा- शेतीच्या हद्दीच्या वादातून भाच्यासह दोघांनी काठीने आणि बुक्क्यांनी गुप्तांगावर मारहाण करून सख्या मामाचा खून केला. बुधवारी रात्री आठच्या सुमारास तांडोर येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. रतनसिंग गुलाबसिंग रजपूत (वय ६५, रा. सिद्धापूर) असे खून झालेल्याचे नाव आहे. राजकुमार महादेव   रजपूत (वय ४५), रवींद्र बाबूशिंग रजपूत (दोघे रा. तांडोर) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. 


याप्रकरणी रतनसिंग यांचा मुलगा हणमंतसिंग रजपूत (३४) याने येथील पोलिसांत फिर्याद दिली. सिद्धापूर व तांडोर ही गावे लगत आहेत. मामा रतनसिंग रजपूत व भाचा राजकुमार रजपूत यांच्यात शेतीच्या हद्दीच्या कारणावरून गेल्या १० वर्षांपासून वाद होता. यापूर्वी रतनचंद रजपूत यांनी दोनवेळा मंगळवेढा पोलिस ठाण्यात राजकुमार याच्याविरुद्ध फिर्याद दिली होती. बांध पोखरण्याच्या कारणावरून रतनसिंग यास ओढत नेले. आंबे तोडल्याचे भासवले. त्यानंतर काठी, बुक्क्यांनी गुप्तांगावर मारहाण करून खून केला. येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले आहे. त्यात दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. पोलिसांनी दोन्ही संशयितांना अटक केली आहे. शुक्रवारी (दि. २५) त्यांना येथील न्यायालयात उभे करण्यात येणार आहे. पोलिस उपनिरीक्षक शाहू दळवी तपास करत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...