आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकसभा, विधानसभा निवडणुकीत काँग्रेसशी आघाडी, चर्चा सुरू : सुनील तटकरे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- हल्लाबोल आंदोलनाच्या निमित्ताने जनतेच्या प्रश्नावर आम्ही सरकारला धारेवर धरले आहे. दिल्लीत पक्षाचे प्रमुख काँग्रेससह इतर विरोधी पक्षांशी महाआघाडी करण्यावर चर्चा सुरू आहे. आम्ही काँग्रेस व इतर समविचारी पक्षांना सोबत घेऊन आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. त्यामुळे इतर कोणत्याही पक्षांना सोबत घेण्याचा प्रश्न येत नसल्याची स्पष्टोक्ती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली. 


राष्ट्रवादी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे आदी उपस्थित होते. कोल्हापूर येथून प. महाराष्ट्रातील हल्लाबोल आंदोलनाला सुरुवात झाली. समारोपाबाबत अंतिम निर्णय झाला नाही. पुणे किंवा इंदापूर हे दोन पर्याय आहेत. त्यानुसार येत्या आठवडाभरात यावर अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी सांगितले. सोलापुरात रखडलेली विकास कामे, भ्रष्टाचार यावरही पावसाळी अधिवेशनात आवाज उठविणार आहोत, असे ते म्हणाले. 


निवडणुका ठरलेल्या वेळेतच 
राज्याचे महसूलमंत्री लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्रित होतील असे सांगतात तर भाजपचे अध्यक्ष अमित शहा विधानसभा व लोकसभा निवडणुका स्वतंत्रपणे होणार असल्याचे म्हणतात. भाजपचे नेतेच निवडणुकीबाबत वेगवेगळी विधाने करीत आहेत. पण दोन्ही निवडणुका ठरलेल्या वेळेतच होणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...