आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाती विस्कळीत झाल्यास कोणी विचारत नाही, एकीची गरज : सुशीलकुमार शिंदे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- भटक्या विमुक्त जाती जमातीचे पालक मुलांना काबाड कष्ट करून मुलांना शिक्षण शिकवतात, अनुसुचित जातीपेक्षा त्याची अवस्था वाईट आहे. तरीही माणुसकी प्रतिष्ठानच्या वतीने समाजातील गुणवंताना एकत्रित करून त्यांचा गौरव केला जात आहे ही चांगली गोष्ट आहे. ४४ जातींना एकत्र ठेवून एकोपा जपण्याचा प्रयत्न केला आहे. हा जातीमधील एकोप्यामुळे विरोध करु शकत नाहीत, जाती विस्कळीत झाल्यास कोणीच विचारत नाही. एकोप्याबरोबर पालकांनी मुलांना जास्तीत जास्त शिक्षण द्यावे, घर खर्चाचे पैसे वाचवून शिक्षणासाठी खर्च करा असे आवाहन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले. 


हुतात्मा सहभागृहात माणुसकी प्रतिष्ठानतर्फे भटक्या विमुक्त जाती जमातींच्या गुणवंत विद्यार्थी, कलाकार, क्रीडाक्षेत्र व ज्येष्ठांबरोबर समाजात विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा गौरव उपस्थितांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना सुशीलकुमार शिंदे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ काँग्रेस नेत्या उज्ज्वला शिंदे, आमदार प्रणिती शिंदे, कर्नाटकातील आमदार प्रकाश राठोड, नगरसेवक लक्ष्मण जाधव, प्रकाश वाले, प्रकाश पाटील, सदानंद गायकवाड, भारत जाधव, नागनाथ गायकवाड आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारत जाधव यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आली. कार्यक्रमास सुभाष जाधव, देवा गायकवाड, नागेश गायकवाड, शशिकांत जाधव, तानाजी जाधव, विठ्ठल जाधव, चंदप्पा क्षेत्री, सिध्दू कराळे, हरिश्चद्र राठोड, चेतन नरोटे, श्रीनिवास तातुसकर, मच्छिंद्र भाेसले, हेमा चिंचोलकर, सुरेश राठोड, सुनीता रोटे आदींसह समाज बांधव उपस्थित होते. 


आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, सध्याचे सरकार दहावी, बारावी विद्यार्थ्यांनाही जात पडताळणी अनिवार्य करण्याचा विचार करीत आहे. हा चुकीचा निर्णय आहे. याला काँग्रेस पक्षाचा नक्कीच विरोध असेल. भटक्या विमुक्तांच्या प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच कटिबध्द आहे. 


भटक्या जमातीच्या मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्न हवेत 
अरुणा वर्मा म्हणाल्या की, भटक्या जमातीमध्ये शिक्षणाचे प्रमाण नगण्य आहे, तरी शहरातील प्रत्येक महाविद्यालयात भटक्यांच्या प्रवेशाचा विचार व्हावा, यासाठी प्रयत्न व्हावा, तसेच घरकुल योजना व जातीचा दाखला काढण्यासाठी घालण्यात आलेली अट शिथिल व्हावी.

बातम्या आणखी आहेत...