आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाच प्रकरणातील फौजदार, पोलिस हवालदाराला न्यायालयीन कोठडी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर -  ८ हजारांची लाच घेताना अटकेत असलेल्या फौजदार व पोलिस हवालदाराला अतिरिक्त सत्र न्यायाधीश यू. बी. हेजीब यांनी बुधवारी न्यायालयीन कोठडी सुनावली. फौजदार केरू रामचंद्र जाधव (वय ५७, रा. न्यू बुधवार पेठ, सोलापूर), पोलिस नाईक संतोष चव्हाण (वय ३४, रा. भोजप्पा तांडा, सोलापूर, नेमणूक - दोघे- जेल रोड पोलिस ठाणे अंकीत अशोक चौक चौकी) यांना मंगळवारी अटक झाली होती. जेल रोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. 


याबाबत एका व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाकडे तक्रार दिली होती. १९६६ मध्ये त्यांनी साईबाबा चौक, न्यू पाच्छापेठ येथे जागा विकत घेतली होती. त्या जागेच्या मालकी हक्कावरून अन्य एका व्यक्तीसोबत वाद सुरू होता. यामुळे त्या व्यक्तीविरुद्ध १८ फेब्रुवारी रोजी अशोक चौकीत तक्रार अर्ज देण्यात अाला होता. त्या अर्जाची चौकशी करून गुन्हा नोंद करण्यासाठी संबंधित व्यक्तीकडे अाठ हजाराची लाच घेताना कारवाई झाली होती. अशोक चौक पोलिस चौकीत फौजदार जाधव यांच्या सांगण्यावारून चव्हाण हे पैसे घेताना दोघांना पकडले अाहे. सरकारतर्फे शांतवीर महिंद्रकर, जाधवतर्फे संजीव सदाफुले, चव्हाणतर्फे शशी कुलकर्णी या वकिलांनी काम पाहिले. 


विहिरीत पडून महिलेचा मृत्यू 
स्वागतनगर जवळील केंगनाळकर वीट भट्टीजवळील विहिरीत अनोळखी पन्नास वर्षीय महिलेचा बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी एकच्या सुमाराला उघडकीस अाली. एमअायडीसी पोलिस ठाण्याचे सहायक फौजदार ए. बी. पवार यांनी उपचाराला शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर मरण पावल्याचे सांगण्यात अाले. मृताची अोळख पटली नाही. त्या विहिरीत पडल्या अाहेत की, अात्महत्या केली अाहे, याचाही शोध पोलिस घेत अाहेत. 
तिहेरी खून : तपासासाठी 


संशयित धुना व वसन यांना अाज कोर्टात हजर करणार 
प्रतिनिधी । सोलापूर 
घरात होणाऱ्या त्रासाला कंटाळून अाई, बहीण व भाऊ या तिघांचा लोखंडी पारीने डोक्यात प्रहार करून खून केल्यामुळे वसन जाधव व धुना जाधव या दोघी सध्या अटकेत अाहेत. गुरुवारी त्यांची पोलिस कोठडी संपणार असून, पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येईल. 
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई गावापासून बारा किलोमीटर अंतरावर भावठाणा हे गाव अाहे. 
त्या ठिकाणी संशयित वसन हिचा मित्र राहतोय. घटनेनंतर ती त्याच्याकडे गेली होती. त्यावेळी नेमकी काय माहिती दिली. अन्य काही बाबी तपासात समोर येतात का? याची माहिती पडताळण्यासाठी सोलापूर ग्रामीणचे एक पोलिस पथक बीड जिल्ह्यात गेल्याची माहिती सोलापूर तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किशोर नावंदे यांनी दिली. अाई हतयबाई, बहीण लाखी व भाऊ मफा या तिघांचा दोघींनीच खून केला अाहे. 

बातम्या आणखी आहेत...