आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोप-प्रत्यारोपानंतर कोठे आणि फलमारी यांनी वाटून घेतले पद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या अध्यक्षपदाबाबत आरोप-प्रत्यारोपानंतर शनिवारी तोडगा निघाला. तीन वर्षे कार्यकाळाचे हे पद निम्म्याने वाटून देण्यात आले. पहिले दीड वर्ष महेश कोठे त्यानंतर सुरेश फलमारी अध्यक्षपदी राहतील. पूर्वभागातील ज्येष्ठ नेते सत्यनारायण बोल्ली आणि विश्वस्तांनी हा निर्णय दिला. त्यानंतर दोघांचाही हार घालून सत्कार करण्यात आला. मागील वर्षाप्रमाणेच सरचिटणीसपदी फलमारी यांनाच ठेवण्याचे ठरले.

 

या वाटाघाटींसाठी युवक संघटनेने पुढाकार घेतला होता. शनिवारी यावर तोडगा निघाला अन् वादावर पडदा पडला. या वेळी विश्वस्त जनार्दन कारमपुरी, नरसप्पा इप्पाकायल, मुरलीधर अरकाल, रामकृष्ण कोंड्याल, पंच नागनाथ मुदगुंडी आदी होते. समाजातील या वादामुळे दुही निर्माण झाली. त्याने आम्ही युवकांनी काय बोध घ्यावा? असा प्रश्न युवक संघटनेने केला. त्यावर तातडीने निर्णय होणे गरजेचे असल्याची भूमिका मांडली. त्यावर श्री. कोठे आणि फलमारी यांनी तोडगा काढण्यास संमती दर्शवली. त्याचे सर्व अधिकार श्री. बोल्ली यांना देण्यात आले होते. सायंकाळी याबाबतचा निर्णय झाल्यानंतर मार्कंडेय मंदिरात जल्लोष झाला. नगरसेवक देवेंद्र कोठे, युवक संघटना अध्यक्ष विजय चिप्पा, सचिव दत्ता बडगू, प्रेसिडेंट धनंजय मुदगुंडी त्यात सहभागी झाले होते.


नऊ विश्वस्त मिळणार अन् सरचिटणीसपदही
अध्यक्ष निवडीनंतर आठ दिवसांतच कार्यकारिणी जाहीर करण्यात येत असे. परंतु यंदा वाद निर्माण झाल्याने ही कार्यकारिणी बाजूलाच राहिली. याबाबतही बैठकीत चर्चा झाली. त्यात फलमारी आणि कोठे यांना प्रत्येकी नऊ जागा देण्याचे ठरले. पहिले दीड वर्षे फलमारीच सरचिटणीसपदी राहतील. त्यानंतर कोठे सांगतील, तेच सरचिटणीस होतील.

बातम्या आणखी आहेत...