आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीर्थक्षेत्रांच्या दर्शनासाठी आता रामायण एक्स्प्रेस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- रामायणात उल्लेख असलेल्या ठिकाणी जाण्यासाठी धार्मिक पर्यटनाची रामायण एक्स्प्रेस सुरू करण्याचा निर्णय आयआरसीटीसीने घेतला आहे. ही रेल्वे देशातील निवडक स्थळांना भेट देणार आहे. 


अयोध्या ते कोलंबो असा १६ दिवसांचा प्रवास असून भक्तांना रामेश्वरमपर्यंत रेल्वेने जाता येणार आहे. पुढचा प्रवास मात्र त्यांना विमानाने करावा लागणार आहे. १४ नोव्हेंबरला रामायण एक्स्प्रेसचा प्रवास दिल्ली येथून सुरू होणार आहे. 
दिल्ली येथील सफदरगंज स्थानकावरून प्रारंभ होईल. अयोध्या, नंदीग्राम, सितामढी, जनकपूर, वाराणसी, प्रयाग, चित्रकुट, नासिक, हंपी आदी ठिकाणांना भेट देईल. 


कोलंबोला जाण्यासाठी विमानासाठी अतिरिक्त रक्कम द्यावी लागणार आहे. आयआरसीटीसीने यासाठी १५,१२० रुपयांचे दर आकारले असून यात प्रवासासह, राहण्याची व जेवण्याची सोय केली आहे. शिवाय गाईडची सोय आहे. एकावेळी ८०० प्रवासी या रेल्वेतून प्रवास करू शकतील. आयआरसीटीसीच्या वेबसाइटवरून या रेल्वेसाठी नाव नोंदवता येते. 


प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभला तर अशा प्रकारच्या सहलीचे वर्षातून दोनदा व तीनदा आयोजन केले जाईल.
-  सिद्धार्थ सिंग, जनसंपर्क अधिकारी, आयआरसीटीसी, नवी दिल्ली 

बातम्या आणखी आहेत...