आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

214 कोटींचे कर्ज थकवणाऱ्या सांगोला, स्वामी समर्थ कारखान्याचा शिखर बँकेला ताबा देऊ!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- अक्कलकोट तालुक्यातील स्वामी समर्थ सांगोला तालुक्यातील सांगोला सहकारी या दोन साखर कारखान्यांचा ताबा शिखर बँकेकडे द्यायला जिल्हा प्रशासन राजी झाले आहे. बँकेच्या मागणीनुसार चर्चा झाली. दोन्ही कारखान्यांकडे महसूल प्रशासनाची जी देणी आहेत, ती देण्यास बँकेने सहमती दर्शवली आहे. प्रस्ताव येताच दोन्ही कारखान्यांचा ताबा शिखर बँकेला देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले. 


माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांच्या ताब्यातील स्वामी समर्थ साखर कारखान्याकडे शिखर बँकेचे ९.३१ कोटी तर जिल्हा बँकेचे ८६.५२ कोटी असे एकूण ९५.८३ कोटी रुपये थकीत आहेत. माजी आमदार दीपक साळुंखे यांच्या ताब्यात राहिलेल्या सांगोला सहकारी साखर कारखान्याकडे महाराष्ट्र शिखर बँकेचे ३९.१२ कोटी तर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ७९.१२ कोटी असे एकूण ११८.२४ कोटी रूपयांचे थकीत कर्ज आहे. बँकेने जिल्हाधिकारी कार्यालयांकडे सरफेसी कायद्यानुसार थकीत कर्जे वसूल करण्याची मागणी केली हाेती. त्यानुसार कारखान्यांवर कारवाई सुरू केली होती. मात्र बँकेने जिल्हा प्रशासनाकडून कारखान्यांवर सरफेसी कायद्यानुसार कारवाई करता कारखान्याची मालमत्ता ताब्यात देण्याची मागणी केली होती. त्यानुसार स्वामी समर्थ साखर कारखाना सांगोला सहकारी साखर कारखान्याचा ताबा देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी भोसले यांनी सांगितले. 


विजयशुगर्सचा १० रोजी निर्णय
ऊसउत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीनुसार दर दिल्याने विजय शुगर्सचा जिल्हाधिकारी कार्यालयाने लिलाव काढला होता. यावर जिल्हा बँकेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. जिल्हा बँकेशी चर्चा करून निर्णय घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले. त्यानुसार १० जानेवारीला संबंधित बँकेचे अधिकारी कारखाना पदाधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. 


ताब्यात घेतल्यानंतर पुढे काय ? 
जिल्हाधिकारीकार्यालयानंतर सांगोला सहकारी स्वामी समर्थ कारखान्यांचा ताबा घेतल्यानंतर दोन्ही कारखाने शिखर बँक ताब्यात घेईल. कारखान्याच्या मालमत्तेचा लिलाव काढून विक्री करेल. त्यातून थकीत कर्जे शासकीय देणी देण्यात येणार आहेत. शिखर बँक जिल्हा बँकेचीच थकीत कर्जे असल्याने शिखर बँकेकडून ही कर्जे अदा केली जाणार आहेत. मात्र दोन्ही कारखान्यांकडील थकीत कर्जे कारखान्याची मालमत्ता पाहता यामुळे कारखान्यांचा लिलाव होणार का ? कारखान्याच्या लिलाव प्रक्रियेत कोण सहभागी होणार, याबाबत शंकाच आहे.

बातम्या आणखी आहेत...