आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिद्धेश्वर मंदिराची अधोगती, काडादींना बडतर्फ करा : विश्वस्त संजय थोबडे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर मंदिराची स्थापना (कै.) अण्णाराव थोबडे यांनी केली असून तसे लेखी दस्त समोर आलेले आहेत. तरी पंच कमिटीच्या बॅनरवर थोबडे यांच्या वारसांच्या नोंदी कराव्यात. आम्ही संस्थापक अध्यक्ष असून मंदिराची अधोगती हाेऊ लागल्याने आम्हाला योग्य ती पावले उचलावी लागत आहेत. काडादी घराणे हे आमच्या देवस्थानचे कारभारी असून त्यांना येथील कामकाज पाहावे, असे काम आमच्या पूर्वजांनी त्यांना दिले होते. परंतु ते अलीकडे आम्हीच संस्थानिक आहोत, अशा अविर्भावात मिरवत आहेत, धर्मराज काडादींना बडतर्फ करा, अशी खरमरीत टीका विश्वस्त संजय थोबडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. 


सोमवारी सकाळी श्री सिद्धरामेश्वर मंदिराच्या सभामंडपात या पत्रकार परिषदेचे आयोजन होते. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, माझे अाजोबा (कै.) अण्णाराव धर्मराव थोबडे हे मंदिराचे संस्थापक असल्याचे काही कागदोपत्री पुरावे मला मिळाल्यानंतर मी या गोष्टीचा २०१७ सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात पाठपुरावा चालू केला. त्यानंतर अनेकवेळेस काही कागदपत्रांची मंदिर समितीकडे मागणी केली. परंतु प्रत्येकवेळेस त्यांनी टाळाटाळ केली तसेच १० जून २०१८ रोजी मलाच बडतर्फ का करू नये? अशी कारणे दाखवा नोटीस दिली आहे. त्यात ११ जून २०१८ च्या दुपारी तीन वाजेपर्यंत उत्तर द्यावे, असे सांगितले आहे. तसेच त्यांच्यावर केलेले आरोप व धर्मादाय आयुक्त कार्यालय, मुंबईकडे केलेला अर्ज माघारी घेत आहे, अशी धमकीवजा सूचना या पत्रात आहे. ३१ मे प्राेसिडिंग बुकच्या नकला मिळाव्या म्हणून मी मंदिर समितीकडे लेखी अर्ज केला. ५ जून रोजी देत नाहीत, असे समजल्यावर मी मुंबई चॅरिटी कमिशनरकडे त्यांना निलंबित करावे, असा ४१ डी हा प्रस्ताव दाखल केला आहे. धर्मराज काडादी हे समाजाला लागलेली कीड आहे. बेकायदेशीर कामे करण्यात काडादी यांचा हातखंडा आहे. सिद्धेश्वर तलावाची वाट लावली आहे. 


२० जून आहे तारीख : ४१ डी या प्रस्तावानुसार काडादी यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे व गैरकृत्य कारभारासंदर्भात २० जून २०१८ रोजी मुंबई चॅरिटी कमिशनर येथे तारीख असून यात काडादी यांचे निलंबन तसेच त्यांनी आजवर केलेल्या चुकीच्या कामांची नुकसान भरपाई यासंदर्भात सुनावणी होत असल्याचे मंदिराचे पुजारी आनंद हब्बू यांनी सांगितले. तसेच पूजेच्या २९ लाख रुपये इतक्या थकीत रकमांसंदर्भात ही यावेळी सुनावणी होईल. 


काही बोलायाचे नाही 
माझी या प्रकरणावर काहीही प्रतिक्रिया नाही, मला काही बोलायचे ही नाही. बोलणारे बोलतील. 
- धर्मराज काडादी, अध्यक्ष, सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटी 


मंदिर समिती आणि थोबडे वाद 
सभामंडपात थोबडेंच्या पत्रकार परिषदेस विश्वस्त गिरीश गोरनळ्ळी व लिपीक राजू कस्तुरे यानी लेखी परवानगीवरून वाद घातला. थोबडे यांनीही मीदेखील विश्वस्त आहे, असे सांगून पत्रकार परिषद सुरू केली. 


हस्ताक्षर परीक्षण अहवाल 
सन १८५५ च्या सिद्धेश्वर संक्रांत उत्सवात २५१ रुपये थोबडे यांनी स्वीकारले अशा व अन्य मजकुराची मूळ हस्ताक्षरातील कागदपत्रे थोबडे यांनी मुंबई येथील तज्ज्ञ हस्ताक्षर परीक्षकांकडून तपासली आहेत. यात ती कागदपत्रे व नंतरची तपासली असता, हस्ताक्षरांचे नमुने जुळले असल्याचे समोर आले आहे. 


तर राजीनामा द्यावा 
आपल्या कारभारावर सर्वजण नाराज असतील, तर आपण पदाचा राजीनामा द्यावा, असे माझे सिद्धेश्वर भक्त म्हणून मत आहे. 
- विजयकुमार देशमुख, पालकमंत्री 


'सुवर्ण सिद्धेश्वर'ची वाट लावली 
'सुवर्ण सिद्धेश्वर' संकल्पनेबद्दल माहिती देताना आनंद हब्बू व थोबडे यांनी आम्ही बनवून दिलेल्या गाभाऱ्यातील सुवर्ण सिद्धेश्वर संकल्पनेच्या पथदर्शी प्रकल्पात अनेक बदल करून वाट लावली आहे. तसेच गर्भगृहातील श्री सिद्धरामेश्वर आणि श्री मल्लिकार्जुुन यांच्या प्रतिमामध्ये भयंकर चुका करून ठेवलेल्या आहेत. 

बातम्या आणखी आहेत...