आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाळ्यांचे ई-लिलाव झालेच पाहिजेत, कर्मचारी रस्त्यावर; आडम मास्तरांवर केली टीका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- व्यापाऱ्यांचे लाड करू नका. अन्यथा महापालिका रसातळाला जाईल. आयुक्तांची उत्पन्न वाढीची भूमिका योग्य असून, गाळ्यांचे लिलाव झालेच पाहिजेत, अशी मागणी मागणी करत बुधवारी महापालिका कामगार कृती संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली. व्यापाऱ्यांची बाजू घेऊन रस्त्यावर उतरणारे नगरसेवक कामगारांच्या प्रश्नाबाबत सभागृहात गप्प का बसतात? असा आरोपही या वेळी करण्यात आला. शिवाय भांडवलदारांची बाजू घेणारे कामगार नेते नरसय्या आडम यांच्यावरही जोरदार टीका करण्यात आली. 


महापालिकेच्या १३८६ गाळ्यांचा ई-लिलाव करण्याची प्रक्रिया आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी सुरू केली आहे. या प्रक्रियेस विरोध करत शहरातील व्यापाऱ्यांनी महापालिका आयुक्तांच्या विरोधात मोर्चा काढला. व्यापाऱ्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी आणि आयुक्तांच्या भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी बुधवारी सर्व कामगार संघटनांनी एकत्र येऊन महापालिकेच्या आवारात आंदोलन केले. डाॅ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आंदोलनाची सुरुवात झाली. या आंदोलनात प्रशासकीय इमारतीमधील कर्मचारी, सफाई कर्मचारी संघटना, मक्तेदार संघटना, रोजंदारी कामगार, झाडूवाले, लिपीक, अधिकाऱ्यांसह सर्व विभागांतील सुमारे दीड हजार कर्मचारी सहभागी झाले होते.

 
बेकायदा मंडप मारल्याने कारवाई करा 
महापालिका आवारात बेकायदा मंडप मारून, स्पिकर लावला आणि ध्वनिप्रदूषण झाले. बेकायदा काम केल्याने संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी बसपचे नगरसेवक आनंद चंदनशिवे, गणेश पुजारी यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. 


गाळे लिलाव रद्द करा, मनसेचे निवेदन 
महापालिकेच्या गाळ्यात पूर्वीपासून तेथील व्यापारी व्यवसाय करत आहेत. त्यांचे लिलाव करून त्यांना रस्त्यावर आणू नका. पोटभाडेकरू असतील तर त्यांची चौकशी करून त्यांना भाडेवाढ करा. लिलाव पद्धत बंद करावी, अशी मागणी मनसेच्या वतीने महापालिकेकडे करण्यात आली. सहायक आयुक्त अभिजित हराळे यांना निवेदन दिले. या वेळी मनसेचे विनायक महिंद्रकर, सुप्रिया महिंद्रकर, जैनोद्दीक शेख, दिनेश भंडारे, दिनेश कुलकर्णी आदी उपस्थित होते. 


तुम्ही मोर्चा काढला तर आम्ही प्रतिमोर्चा काढू 
अध्यक्ष जानराव म्हणाले, आम्ही कामगारांचे हित पाहतो. मनपाचे उत्पन्न आयुक्त वाढवत असतील तर आम्ही आयुक्तांच्या बाजूने राहणार अाहोत. सरकारने भूमिका बदलली तर महापालिका रसातळाला जाईल. मोर्चा काढला तर आम्ही प्रतिमोर्चा काढू. या वेळी प्रदीप जोशी, दीपक दोड्यानूर यांचीही भाषणे झाली.मंचावर कृती समितीचे मोहन कांबळे, शांताराम अवताडे, आर. डी. जाधव, सारिका आकुलवार, कासार, जनार्दन शिंदे, गदवालकर, झेड. ए. नाईकवाडी आदी उपस्थित होते. 

बातम्या आणखी आहेत...