आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूरच्या व्यापाऱ्यांना तूर्तास दिलासा; गाळ्यांच्या लिलावास मिळाली स्थगिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- महापालिकेच्या गाळ्यांच्या लिलावास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तूर्त स्थगिती दिली आहे. लिलाव प्रक्रिया थांबवावी, या मागणीसाठी व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी नागपुरात मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. व्यापाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेऊन मुख्यमंत्र्यांनी लिलावास स्थगिती दिली आहे, अशी माहिती महापौर शोभा बनशेट्टी यांनी दिली.

 
आयुक्त डाॅ. अविनाश ढाकणे यांनी महापालिकेच्या १३८६ गाळ्यांचा ई लिलाव करण्याची हालचाल सुरू केली आहे. त्याला व्यापाऱ्यांचा विरोध आहे. लिलाव प्रक्रिया थांबवावी, यासाठी व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी, माजी आमदार नरसय्या आडम, व्यापारी संघर्ष समितीचे अशोक मुळीक, भाजप शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी, नगरसेवक आनंद चंदनशिवे, नागेश वल्याळ, आदी उपस्थित होते.

 
मुख्यमंत्र्यांनी गाळ्यांच्या लिलावाला तूर्त स्थगिती दिली. गाळ्यांच्या लिलावासाठी लवकरच नवीन नियमावली तयार करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 
- शोभा बनशेट्टी, महापौर 


मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्याने व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. याबाबतचा आदेश शासनाकडून महापालिकेला पाठवण्यात येणार आहे. 
- अशोक मुळीक, अध्यक्ष, मनपा गाळे व्यापारी संघर्ष समिती 

बातम्या आणखी आहेत...