आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजार समिती गैरव्यवहार प्रकरणी अटकपूर्व जामिनावर सोमवारी सुनावणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत ३९ कोटी ६ लाख ३९ हजार कथित गैरव्यवहारप्रकरणी तत्कालीन सभापती, सदस्य, सचिव यांच्यावर जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यात दिलीप माने, इंदुमती अलगोंडा यांच्यासह पाच जणांना अंतरिम अटकपूर्व जामीन मिळाला. अन्य संचालकांनीही जामिनासाठी अर्ज केला होता. या सगळ्यांच्या अटकपूर्व जामिनावर येत्या सोमवारी (ता. ११) अतिरिक्त सत्र न्यायाधीश यू. जी. हेजीब यांच्या समोर सुनावणी होणार आहे. 


जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग रजपूत यांनी या खटल्याची सुनावणी एकाच न्यायालयात व्हावी, असा अर्ज न्यायालयात सादर केला. त्यानुसार सर्व संचालकांचे अटकपूर्व जामीन एकाच न्यायालयात होईल. यापूर्वी काही संचालकांना अंतरिम अटकपूर्व जामीन मिळालेला आहे. काही संचालकांना अद्याप मिळालेला नाही. त्या सर्वांच्या अर्जावर सोमवारीच सुनावणी होईल. प्रशासक सुरेश काकडे फिर्यादी आहेत. सरकारतर्फे अॅड. रजपूत तर संचालकांच्या वतीने अॅड. धनंजय माने, बी. डी. कट्टे, शशी कुलकर्णी ही मंडळी काम पाहत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...