आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहकारमंत्री गटाची पालकमंत्र्यांवर मात; एमआयएम, सेनेच्या साथीने झोन ताब्यात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- नाट्यमय घडामोडींनी महापालिकेतील राजकारणाला मंगळवारी वेगळीच कलाटणी मिळाली. सहकारमंत्री सुभाष देशमुख गटाच्या १६ नगरसेवकांच्या मदतीला शिवसेना एमअायएमचे नगरसेवक धावून आले आणि विभागीय कार्यालये चक्क वाटून घेतली. त्यांची गुप्त हातमिळवणी काँग्रेस राष्ट्रवादीला गाफील ठेवण्यात यशस्वी झाली. त्यामुळे काँग्रेसच्या हाती धुपाटणेच आले. 


पालकमंत्री गटाचे ३५ नगरसेवक गैरहजर राहणार असे दिसून आल्याने सहकारमंत्री गटाने शिवसेनेचे महेश कोठे यांच्याशी हातमिळवणी केली. दोन झोन समित्या देण्याच्या अटीवरून सभागृहात साथ देण्याची तयारी सेनेने केली होती. दुसरीकडे ३५ नगरसेवक गैरहजर राहतील. त्यामुळे सभा तहकूब होईल, असा कयास काँग्रेस बांधून होता. प्रत्यक्ष सभागृहात वेगळेच फासे पडू लागल्याने इतर विरोधी पक्षांचे सदस्य अचंबित झाले होते. त्याने थोडासा गाेंधळ झाला. फाईल भिरकावण्याचे प्रकार झाले. याच गोंधळात २१ विषय चर्चेविना मंजूर करण्यात आले. विषयांचे वाचन नागेश वल्याळ यांनी केले. 


सभागृहात मंजूर झालेले विषय
हद्दवाढ भागातील नोटरी खरेदीवरील मिळकती महापालिकेत नोंद करून घेणे, अमृत याेजनेतील कामाच्या आराखड्यास मंजुरी देणे, परिवहन समिती सदस्यांना मानधन हजार करणे, एड्स बाधिताना मोफत बसप्रवास, व्होल्वो बस भाड्याने देणे, अमृत योजनेतून रोहिणीनगर, जानकीनगर, गीतानगर, सोरेगाव येथील बागेचे काम, ९.३५ कोटीच्या विकास कामास मंजुरी देण्यात आली. 

 

काेण काय म्हणाले... 


काँग्रेसचे सोयीचे राजकारण: महेश कोठे, विरोधीपक्षनेते 
सुरुवातीपासूनच काँग्रेसची भूमिका स्पष्ट नाही. अंदाजपत्रक एकमताने केले. नंतर दुसऱ्या सभेत बदलत भाजपसोबत गेले. त्यामुळे त्यांनी सोयीचे राजकारण केले. त्यामुळे आम्ही भाजपसोबत गेलो. 


विकासाला फटका : आनंद चंदनशिवे, बसपगटनेते 
सहकारमंत्रीआणि पालकमंत्री यांच्यातील गटबाजीचा फायदा शिवसेनेचे महेश कोठे यांनी उचलला आणि त्यांनी दोन झोन समित्या पदरात पाडून घेतले. गटबाजीमुळे शहराचा विकास खुंटला आहे. 


आयुक्तांकडे तक्रार : चेतन नरोटे, काँग्रेस गटनेते 
केलेली झोन समिती भाैगाेलिक परिस्थितीनुसार योग्य नाही. त्याबाबत सभागृहात आम्हाला बोलू दिले नाही. त्यामुळे आयुक्तांनी विषय नामंजूर करावा. महापौरांनी लोकशाहीचा गळा घोटला. 


आज सीएमकडे बैठक 
पालिकेतील ही गटबाजी आता मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचली आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी बुधवारी मुंबईत बैठक बोलावण्यात आली आहे. त्यासाठी शहराध्यक्षांसह पदाधिकारी, संघटन पातळीवरील नेते मंगळवारी रवाना झाले आहेत. 


त्यांना निरोप दिला 
सभेत महत्त्वाचे विषय होते. त्यामुळे सभा चालवणे गरजेचे होते. सर्व नगरसेवकांना लेखी पत्र पाठवले. आमचेच ३५ नगरसेवक आले नाहीत. याबाबत शहराध्यक्षांना कळवले आहे. मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली. तेथे बाजू मांडेन.
- शोभाबन शेट्टी, महापौर 


कारवाईशिवाय नाही 
सभेचा निरोप मिळाला नाही. महापौरांनी विरोधकांना सोबत घेऊन कामकाज केले. हे पक्षविरोधी कृत्य आहे. १६ नगरसेवक भाजपचे होते. त्यांच्यावर कारवाई होईपर्यंत आम्ही ३५ नगरसेवक कामकाजात सहभागी नाही.
- संजयकोळी, मनपा स्थायी समिती सभापती 


असे आहेत झोन, कंसातकोणाची सत्ता असणार 
- झोन क्रमांक (शिवसेना), प्रभाग ६, ७, १५ (शिवसेना ८, काँग्रेस ४) : ठिकाण- दत्त चौक सध्याचे एक. 
- झोन क्रमांक (शिवसेना) प्रभाग ९,१०,११ (शिवसेना ८, भाजप ४) : ठिकाण- राजेंद्र चौक सध्याचे दोन. 
- झोन क्रमांक (भाजप) प्रभाग ३,४,८ (भाजप) ठिकाण- मंगळवार बाजार सध्याचे झोन क्रमांक तीन. 
- झोन क्रमांक (भाजप) प्रभाग १२, १३, १७ (भाजप ८, शिवसेना २, एमआयएम १, माकपा १) ठिकाण - सिव्हिल हाॅस्पिटलसमाेर जुना झोन क्रमांक 
- झोन क्रमांक (एमआयएम) प्रभाग १४, १६, २१ (भाजप २, शिवसेना ३, एमआयएम ७) ठिकाण- साधू वासवानी उद्यान. सध्याचे झोन ५. 
- झोन क्रमांक (भाजप) प्रभाग १८, १९, २० (भाजप ६, शिवसेना १, काँग्रेस ५)ठिकाण - अंत्रोळीकर नगर. 
- झोन क्रमांक (भाजप) प्रभाग २६, २५ (भाजप ४, काँग्रेस २) ठिकाण- जुळे सोलापूर पाण्याचे टाकी. 
- झोन क्रमांक (भाजप) प्रभाग २२, २३, २४ (भाजप ५, शिवसेना २, राष्ट्रवादी ४, एमआयएम १) ठिकाण- डफरीन चौक सध्याचे झोन क्रमांक ६. 
- झोन क्रमांक (भाजप) प्रभाग १, २, (भाजप ८, बसपा ४) ठिकाण- रूपा भवानी मंगल कार्यालय. 
- (पक्षांकडे राहिले : भाजप - ६, शिवसेना - २, एमआयएम - १) 

बातम्या आणखी आहेत...