आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्थायी समितीत येऊन सभापती होण्यासाठी नगरसेवकांत चुरस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- महापालिका स्थायी समितीतून सभापती संजय कोळी, श्रीनिवास रिकमल्ले, रवी गायकवाड, मीनाक्षी कंपली, नागेश गायकवाड, तस्लिम शेख, महेश कोठे, गुरुशांत धुत्तरगावकर बाहेर पडले. मनपाचे अंध सेवक गजेंद्र गुटाळ, मनपा शाळेतील विद्यार्थी परशुराम गुजराथी, भक्ती चव्हाण या मुलांच्या हस्ते चिठ्ठी काढून बाहेर पडणाऱ्यांची नावे निश्चित करण्यात आली. 


ज्या पक्षाचे सदस्य बाहेर पडले त्याच पक्षाचे सदस्य पुन्हा आत येतील. फेब्रुवारी महिन्याच्या सर्वसाधारण सभेत नवीन आठ सदस्यांची नियुक्ती होईल. नव्याने सदस्य आल्यानंतर सभापती पदासाठी भाजपमध्ये रस्सीखेच सुरू होईल. आठ सदस्य बाहेर पडले असले तरी तितकेच त्याच पक्षाचे सदस्य आत येतील. सत्ताधारी भाजपत स्थायीत येऊन सभापती होण्यासाठी शक्ती पणाला लावली जात आहे.

 
महापालिका सभागृह नेता निवडावा लागेल 
महापालिका सभागृहात नवीन नावाची शिफारस महापौरांकडे पक्षनेते यांच्याकडून येते. भाजपचे पक्षनेते सुरेश पाटील आजारी असल्याने त्यांच्या ऐवजी प्रभारी सभागृह नेता निवडावा लागेल. पक्षाने ठरवले तर सभागृह नेता निवडता येईल. 


हे पडले बाहेर 
संजय काेळी, रवी गायकवाड, श्रीनिवास रिकमल्ले, मीनाक्षी कंपली (भाजप), महेश कोठे, गुरुशांत धुत्तरगावकर (शिवसेना), नागेश गायकवाड (राष्ट्रवादी), तस्लीम शेख (एमआयएम). 


भाजपमध्ये रस्सीखेच 
सत्ताधारी भाजपतील नगरसेवक स्थायी समितीत येण्यासाठी इच्छुक आहेत. यासाठी रस्सीखेच सुरू आहे. सदस्य झाल्यानंतर सभापती होण्यासाठी ताकद लावता येणार आहे. सदस्य होण्यासाठी इच्छुकांची संख्या भाजपत जास्त आहे. विद्यमान सदस्यात नागेश वल्याळ, श्रीनिवास करली इच्छुक अाहेत. वल्याळ हे सभागृह नेता होण्यासाठी जास्त प्रयत्नशील आहेत. अविनाश पाटील, अंबिका पाटील, अमर पुदाले, शिवानंद पाटील आदी इच्छुक आहेत. 


यांना मिळू शकते संधी 
महापालिका स्थायी समितीत सलग सात वर्षे सदस्य राहण्याचा विक्रम बसपचे नगरसेवक आनंद चंदनशिवे करणार आहेत. शिवसेनेतून कोठे आणि धुत्तरगावकर बाहेर पडले असेल तरी इच्छुकात गणेश वानकर, भारत बडूरवाले, राजकुमार हंचाटे, देवेंद्र कोठे आदी इच्छुक आहेत. राष्ट्रवादीकडून किसन जाधव यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. एमआयएमकडे इच्छुकांची यादी असली तरी तौफिक शेख, रियाज खैरदी यांची वर्णी लागू शकते. काँग्रेसचा एकही सदस्य बाहेर पडला नाही. त्यामुळे स्थायी समिती सदस्य होण्यासाठी काँग्रेस नगरसेवकांना पुढील वर्षापर्यंत वाट पाहावी लागणार आहे. 


१८० कोटी योजनेवर लक्ष 
स्थायी समिती सभापती संजय कोळी हे पालकमंत्र्यांचे विश्वासातले आहेत. त्यांची चिठ्ठी निघाल्यानेे बाहेर पडले. सन २०१८-१९ मध्ये स्थायी समितीत १८० कोटी ड्रेनेज योजनेचा प्रस्ताव येणार आहे. याशिवाय ६९२ कोटींच्या दुहेरी जलवाहिनीचा प्रस्ताव येणार आहे. या वर्षात निवडणुका नसल्याने आचारसंहिता नसेल. त्यामुळे पूर्णवेळ काम करता येईल. पुढील वर्षी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका असल्याने अाचारसंहितेत जास्त कार्यकाळ जाईल. 


दोन्ही गटाकडून प्रयत्न 
सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यात गटाकडून नगरसेवक प्रयत्न करत आहेत. भाजपचे सहकारमंत्री गटाचे कंपली तर पालकमंत्री गटाचे कोळी, रिकमल्ले, गायकवाड बाहेर पडले आहेत. त्यामुळे नव्याने येणारे पालकमंत्री गटाचे सदस्य जास्त असतील. 


हे राहिले 
नागेश वल्याळ, श्रीनिवास करली, जयश्री बिराजदार, मनीषा हुच्चे (भाजप), विठ्ठल कोटा (शिवसेना), नरसिंग कोळी, प्रवीण निकाळजे (काँग्रेस), आनंद चंदनशिवे (बसप).

बातम्या आणखी आहेत...