आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुद्ध पाण्यासाठी महापालिकेने, इंद्रभुवनवर बसवला आरअो प्लांट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - शहराला शुध्द पाणीपुरवठ्याची जबाबदार असलेल्या महापालिकेनेच इंद्रभुवन इमारतीवर पाणी शुध्दीकरणासाठी आरअो प्लांट बसवण्यात आला आहे. शहरातील पाणीपुरवठा शुद्ध होत असल्याचे महापालिकेचे वतीने सांगण्यात येत असताना तर आरो प्लांट का बसविला असा प्रश्न आहे. 


शहरात दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमधून ओरड होत आहे. मात्र, महापालिकेकडून शुध्द पाणीपुरवठा केला जात असल्याचे सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे आपल्याच पाण्यावर महापालिकेचा विश्वास नसल्याने इंद्रभुवन इमारतीवर आरो प्लांट बसवण्यात येत आहे. त्यासाठी सुंदरशा इमारतीवर पत्राशेड मारण्यात येत असून त्याठिकाणी संच बसविण्यात आले आहे. महापालिका कौन्सिलवरही पाणी शुद्ध करणारे आरो प्लांट बसविण्यात येणार आहे. 


शुद्ध पाण्यासाठी प्लांट बसवला 
प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आल्याने प्लांट बसवण्यात आला आहे. महापालिकेचे पाणी शुद्ध असते, आणखी शुद्धता यावी म्हणून हा प्लांट बसवण्यात आला आहे.'' गंगाधर दुलंगे, मनपा सार्वजनिक आरोग्य अभियंता 

बातम्या आणखी आहेत...