आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरोत्थानातून 32 कोटींचे 13 रस्ते, विषय सभागृहापुढे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - नगरोत्थान योजनेतून शहरात २५२ कोटींचे रस्ते करण्यात येत आहेत. काही रस्त्यांची रुंदी आराखड्यानुसार प्रत्यक्षात जागेवर मिळत नाही. त्यामुळे उपलब्ध रुंदीनुसार रस्ते बांधणी करण्यास शासनाने परवानगी दिली. त्यानुसार महापालिकेने शहरात ३२ कोटी ८४ लाखांचे १३ रस्ते करणार आहेत.

 

नव्या रस्त्यांसाठी मक्तेदार निश्चित केला. त्यांना वर्कआॅर्डर देण्यात येणार असून, आयुक्तांनी सभागृहापुढे हा विषय ठेवला आहे. या पूर्वी शहरात नगरोत्थान रस्ते करण्यात आले. त्या रस्त्यांचे खोदकाम ड्रेनेज व पाणीपुरवठा कामासाठी करण्यात आले. प्रती किलोमीटर एक कोटी रुपये खर्च करून करण्यात आलेले रस्ते महापालिका बिनधास्त खोदत आहे. त्या रस्त्याचे काय? असा प्रश्न उपस्थित होतो. हे रस्ते खोदल्याची माहिती नगर अभियंता यांना माहीत नव्हती. त्यांच्याकडून विनापरवाना रस्ता खोदकाम करण्यात आले.

 

खासगी विकासक
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महापालिकेच्या सोरेगाव येथील एसआरपी कॅम्पच्या मागील बाजूस २३७१२ चौ. फू. जागेवर घरकुल बांधण्यात येणार आहे. ज्यांना घरे नाहीत त्यांना आणि जे लोक बेघर झाले त्यांना घरे मिळतील.

 

आहे त्या रुंदीत काम
मूळ रस्ते आराखड्यात रुंदी जास्त होती. पण प्रत्यक्षात त्याप्रमाणे जागा उपलब्ध नाही. त्यामुळे महापालिकेने उपलब्ध जागेनुसार रस्ता करण्यासाठी शासनाकडे परवानगी मागितली. त्यास शासनाने मंजुरी दिल्याने त्यानुसार आता काम करण्यात येणार असल्याचे प्र. नगर अभियंता संदीप कारंजे यांनी सांगितले. यामुळे विजापूर वेस, मधला मारुती, सराफ कट्टा, बलिदान चौक, कुंभार वेस, शेळगी, पोटफाडी चौक, शास्त्री नगर, जैन मंदिर आदी ठिकाणच्या अस्तित्वात असलेल्या मिळकतदारांची जागा वाचणार अाहे. महापालिकेकडे भूसंपादनसाठी रक्कम नसल्याने अशा प्रकारची कामे करण्यात येत आहेत.

 

येथे होतील रस्ते
इंचगेरी मठ ते मोदी भुयारी मार्ग, सुनीलनगर ते विठ्ठलनगर ते बसवेश्वर नगर, राजस्वनगर ते प्रतापनगर, नागू नारायणवाडी ते डोणगाव रोड, पोटफाडी चौक ते आॅफिसर्स क्लब, सात रस्ता ते रूपा भवानी, विद्यानगर ते दहिटणे, महालक्ष्मी मंदिर ते राठी टेक्स्टाईल, मित्रनगर, शेळगी ते दहिटणे, २५६ गाळा ते गोंधळीवस्ती, न्यू पुणे नाका ते सायन्स सेंटर, मुरारजी पेठ जैन मंदिर ते आइस फॅक्टरी ते हिरज रोड ते खमितकर काॅम्प्लेक्स, वीर सावरकर चौक ते सात रस्ता. या १३ रस्त्यांसाठी ३२ काेटी ८४ लाख ४१ हजार ९३७ रुपये खर्च येणार आहे.

 

बातम्या आणखी आहेत...