Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | news about work of road in solapur

पूर्वी म्हणाले, पावसाळ्यानंतर रस्त्याची कामे, पण आता सुरू

म. युसूफ शेख | Update - Aug 02, 2018, 12:19 PM IST

गेल्या दोन वर्षांपासून जुना बोरामणी नाका ते दयानंद कॉलेज रस्ता खड्ड्यात आहे. जणू काही दर्जेदार रस्ते करणार असल्याच्या अव

 • news about work of road in solapur

  सोलापूर- गेल्या दोन वर्षांपासून जुना बोरामणी नाका ते दयानंद कॉलेज रस्ता खड्ड्यात आहे. जणू काही दर्जेदार रस्ते करणार असल्याच्या अविर्भावात पावसाळ्यानंतर डांबरीकरण केले जाईल, असे महापालिकेने सांगितले हाेते. आणि आता मात्र शासनाचा नवीन आदेश आल्याचा दाखला देऊन रस्त्याच्या डांबरीकरणाचा सपाटा लावला आहे. दुसरीकडे शहरातील अनेक रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रमाणात वाढ होत असून, नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या सर्व प्रकारांतून मनपाच्या कारभाराचा बेजबाबदारपणा दिसून येत आहे.


  शासनाची नवीन नियमावली
  रस्त्याच्या वर पाणी थांबलेले अथवा वाहत असल्यास, पाऊस पडण्याची स्थिती निर्माण झाल्यास, पाऊस असल्यास, धुके अथवा धुळीची वादळे असल्यास, बेस, बाईन्डर कोर्स अथवा पृष्ठभाग ओला असल्यास, ज्यावर डांबरीकरण करावयाचे आहे, अशा पृष्ठभागाचे तापमान १० अंश सेल्सियसपेक्षा कमी असल्यास, रस्त्याच्या पृष्ठ भागापासून २ मीटर उंचीवर तापमानास ४० किमी प्रती तास यापेक्षा जास्त वेगाने वारे वाहत असल्यास डांबरीकरणाचे काम करू नये, असे निर्देश आहेत.


  रस्ते करण्यासाठी लागणारे साहित्य मक्तेदारांना मिळते. पण महापालिकेला खड्डे बुजवण्यासाठी प्रिमिक्स मिळेना. डांबर खरेदी करणे आवश्यक आहे. असा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने १८ मे २०१८ रोजी सर्वसाधारण सभेकडे पाठवून दिला. यानंतर आजपर्यंत हा विषय अजेंड्यावर घेण्यात आला नाही. खरे पाहता तेव्हाच हा विषय तातडीने मंजूर करणे अपेक्षित होते. प्रस्ताव मंजुरीसाठी कशाची वाट पाहिली जातेय? असा प्रश्न पडला आहे.


  पावसाळ्यात डांबरीकरणाची कामे करा : शासन निर्देश
  एरव्ही पावसाळ्यात रस्त्यांची कामे केली जात नसत. पावसामुळे रस्त्यांवर डांबर चिकटत नाही, निघून जाते. मात्र आता राज्य शासनाच्या नवीन निर्देशानुसार पावसाळ्यातही डांबरी रस्त्याची कामे केली जात आहेत. काही प्रभागात डांबरी रस्त्यांची कामे सुरू आहेत. महापालिकेने मोजक्या प्रभागातील कामे न करता गरज पाहून प्राधान्याने ती कामे करावीत, असे नागरिकांतून बोलले जात आहे.


  या रस्त्यांवर डांबरीकरण
  > वसुंधरा महाविद्यालय ते विजापूर रोड
  > आसरा ब्रिज परिसर
  > पोलिस आयुक्तालय ते गुरुनानक चौक
  > चैतन्य भाजी मंडई ते सैनिकनगर
  > दावत हॉटेल ते मीरानगर


  सहा रस्त्यांची कामे होत आहेत
  डांबर खरेदीच्या विषयाला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी मिळताच डांबर खरेदी करून प्रिमिक्सने सर्व खड्डे दुरुस्त करून घेऊ. तसेच नगरोत्थान योजनेंतर्गत सहा रस्त्यांची कामे होत आहेत. तर पाच रस्त्यांची कामे तांत्रिक कारणामुळे थांबली आहेत. शहरातील काही रस्ते स्मार्ट सिटीच्या योजनेंतर्गत होणार आहेत.
  - संदीप कारंजे, नगर अभियंता


  तांत्रिक कारणाने रखडलेले रस्ते
  > दयानंद काॅलेज ते जुना बोरामणी नाका
  > कोंतम चौक ते कुंभारवेेस
  > भारतीय चौक ते बाराई इमाम चौक
  > अक्कलकोट रोड ते मल्लिकार्जुननगर
  > बारामुरी चौक ते शिकलगर वस्ती
  > बॉम्बे पार्क ते सुभाषनगर
  > जुनी जोडभावी पेठ पोलिस चौकी ते चिराग भवन

Trending