आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुतळे पाडणारी लोकशाहीला मारक प्रवृत्ती उद्या माणसांचेही मुडदे पाडणार, निखिल वागळे यांचे प्रतिपादन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, एम. एस. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांचे मारेकरी आणि पुतळे पाडणाऱ्यांची प्रवृत्ती एकच आहे. विचारधारेसाठी ती उद्या सामान्य माणसांचेही मुडदे पाडणार. लोकशाहीसाठी हे मारक आहे. देशातील सहिष्णुता अधिकाधिक बिघडत चाललेली असतानाच त्यावर कोणी बोलायला तयार नाही. बाेललो, की आपला पानसरे होईल, अशी भीती वाटते. हीच स्थिती राहिली तर देशातील लोकशाही संपुष्टात येणार. देशात या पुढे अधिकृत आणीबाणी घोषित होणार नाही. ती हळूहळू लागू झालेलीच आहे, हे लक्षात घ्या, असे रोखठोक विचार ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी येथे मांडले.

 

जबाब दो आंदोलन कृती समितीच्या वतीने आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. 'देशातील वाढती असहिष्णुता आणि आपण' हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय हाेता. शिवछत्रपती रंगभवनमध्ये त्यांना ऐकण्यासाठी तुडुंब गर्दी होती. मंचावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रवींद्र मोकाशी, यशवंत फडतरे, हसीब नदाफ, अॅड. गोविंद पाटील, विजय पोटफोडे आदी उपस्थित होते. देशाची सद्यस्थिती आणि घडामोडींचा परामर्श घेत त्यांनी पुढील हाका दिल्या. ते म्हणतात- "त्रिपुरामध्ये सत्तांतर झाल्यानंतर लेनिनचा पुतळा पाडला. त्याच वेळी कोलकत्यात श्यामाप्रसाद मुखर्जींच्या पुतळ्यावर हल्ला झाला. उत्तर प्रदेशात डॉ. आंबेडकर पुतळ्याची विटंबना झाली. तामिळनाडूमध्ये रामस्वामी पेरियार यांच्या पुतळ्यावर चालून गेले. देशात लोकशाही, सहिष्णुता असेल तर एकमेकांच्या प्रतीकांची विटंबना करणारी ही कुठली प्रवृत्ती आहे? या पूर्वीही देशात अनेक वेळा सत्ताबदल झाले. परंतु पुतळे पाडणे, विटंबना करणारे प्रकार झाले नाहीत. ती भारतीय लोकशाहीची संस्कृती नाही. मागील सरकार घोटाळेबाज निघाले म्हणून सत्तांतर झाले. जनतेला विकास हवाय. तो तर नाहीच, पण दोन गटांत, जातींमध्ये विष पेरण्याचे काम पद्धतशीरपणे सुरू आहे. याचे उदाहरण १ जानेवारीला पाहता आले. भीमा-कोरेगाव येथील शौर्यस्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेलेल्या दलित बांधवांवर सुनियोजित हल्ला झाला. तो कुणी घडवला, हे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलेले आहे. पण यातील दोषींना अटक होत नाही.अशीच स्थिती दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, लंकेश यांच्याबाबतही सांगता येईल. त्यांचे मारेकरी अद्याप सापडत नाहीत. त्यांना शोधून शिक्षा करण्याची इच्छाशक्ती नाही.  


रविशंकर यांना काय साध्य करायचे आहे?
राम मंदिराला विरोध झाला तर देशाचा सीरिया होईल, असे श्रीश्री रविशंकर म्हणाले. सीरियात काय चालले आहे, हे त्यांना माहीत आहे काय? बॉम्बहल्ल्यांमध्ये १० लाख बालकांचा मृत्यू झाला. हा प्रकार भारतात घडवून आणायचे का? रविशंकर असो, की बाबा रामदेव ही मंडळी नागपूरच्या हिंदुत्वाचा अजेंडाच राबवत आहे, असे श्री. वागळे म्हणाले.

 

पेशव्यांचा शनिवारवाडा बाटला म्हणून हल्ला
भीमा कोरेगाव प्रकरणाच्या अाधी पुण्याच्या शनिवार वाड्यात एक परिषद झाली. त्याला मोठा विरोध झाला होता. महापौर मुक्ता टिळक यांनी विरोध केला. मिलिंद एकबोटे यांचीही हरकत होती. दुसरीकडे नाव बदलून निघालेले संभाजी भिडे तरुणांच्या माथी भडकवत होते. शनिवारवाडा बाटला याचा राग काढण्यासाठीच भीमा-कोरेगाव येथे दलितांवर हल्ले झाले.

बातम्या आणखी आहेत...