आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेतू कार्यालयातच नाही आधार नाेंदणी केंद्र; महा ई-सेवा केंद्रांतूनच सुरू आहे नोंदणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- अाधार क्रमांक आता सर्वच शासकीय योजनांसाठी अत्यावश्यक झाला आहे. जिल्ह्यात ९२ टक्क्यांपेक्षा अधिक नागरिकांची नोंदणी झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने शासकीय इमारतीमध्ये आधार नाेंदणी केंद्र सुरू करावी, असे आदेश दिले असतानाही अद्याप एकाही ठिकाणी आधार नोंदणी केंद्र सुरू केले नाही. सेतू कार्यालयात केंद्र आवश्यक असताना सुरू करण्यात आलेेले नाही. जिल्हा प्रशासनानेही आधार केंद्र किती ठिकाणी सुरू आहेत, याची माहितीच आमच्याकडे मिळत नाही, मात्र याबाबत महा ऑनलाइनला माहिती मिळवण्यासाठी पत्र देण्यात येणार असल्याचे सामान्य शाखेकडून स्पष्ट करण्यात आले. 


जिल्हा प्रशासनाकडे एकूण १५८ आधार किट उपलब्ध आहेत, यापैकी १०२ सुरू असून, यापैकी २२ शहरात तर ८० ग्रामीण भागात सुरू आहेत. शहरात २२ आधार किट हे महा ई-सेवा केंद्राकडेच सुरू आहेत. ३६ किटसाठी युआयडी सेंटरकडून परवानगी मिळाली नाही तर अधिक पैसे घेतल्याने १४ महा ई-सेवा केंद्रांना काळ्या यादीत टाकले आहे. ६ ठिकाणचे आधार केंद्र बंद केल्याची माहिती व्यवस्थापक श्री. इगवे यांनी दिली. उत्तर तहसील कार्यालयात आधार कंेद्र नाही. पण असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येते. 


अधिकाऱ्यांचा आदेश कागदावरच 
प्रत्येक सेतू कार्यालय, महापालिका झोन कार्यालय, महाविद्यालये, शाळा, अंगणवाड्या याठिकाणी अाधारची नोंदणी करण्याचे आदेश तत्कालीन निवासी उपजिल्हाधिकारी अजित रेळेकर यांनी दिले होते. मात्र महा ई-सेवा केंद्र वगळता इतरत्र कोठेही आधार नोंदणी होत नाही. 


महा ई-सेवा केंद्राची चौकशी नाही 
"दिव्य मराठी'ने डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात "आधार नोंदणी करण्यासाठी नागरिकांकडून लूट' असे वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतरही एकाही महा ई-सेवा केंद्रात कोणत्या सेवेसाठी किती शुल्क आकारले जाते याचे दरफलक लावले नाहीत. 

बातम्या आणखी आहेत...