आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंढरपूरप्रमाणे अाता काेल्हापूरच्या मंदिरातही सर्वजातीय पगारी पुजारी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काेल्हापूर- पंढरपूरमधील श्री विठ्ठल मंदिराप्रमाणेच अाता काेल्हापुरातील श्री महालक्ष्मी मंदिरातही सर्व जातींतून पगारी पुजारी नेमण्याचा निर्णय पश्चिम देवस्थान मंदिर प्रशासन समितीने शुक्रवारी घेतला. त्यासाठी मंगळवारपासून मुलाखतीही हाेणार अाहेत. या नियुक्तीत विद्यमान पुजाऱ्यांना प्राधान्य देण्याची तरतूद देवस्थानने केली अाहे. मात्र, एकाही विद्यमान पुजाऱ्याने त्यासाठी अर्ज केलेला नाही, हे विशेष. 


श्री महालक्ष्मी देवीच्या मूर्तीला घागरा-चाेळी नेसवण्याच्या प्रकारानंतर काेल्हापुरात पारंपरिक पुजाऱ्यांच्या हकालपट्टीसाठी अांदाेलन झाले हाेते. विधिमंडळातही त्याचे पडसाद उमटले. अखेर राज्याच्या विधी व न्याय खात्याने देवस्थान समितीला स्वतंत्र समिती स्थापन करून पगारी पुजारी नियुक्तीची प्रक्रिया करण्यास सांगितले आहे. त्यानुसार समितीकडे 117 जणांचे अर्ज आले आहेत. त्यांच्या मुलाकती 19 जूनपासून होणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...