आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा कर आता बँकेतही भरता येणार, १३ ठिकाणी होणार सोय; आयुक्तांची माहिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- आपल्या मिळकतीची महापालिका कर आकारणी बिले भरण्यासाठी महापालिकेकडे येण्याची गरज नाही. आपल्या परिसरातील एचडीएफसी आणि आयसीआयसी बँकेत कर बिले भरता येणार असून शहरातील विविध भागात १३ ठिकाणी तशी सोय करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त डाॅ. अविनाश ढाकणे यांनी दिली. बिल मिळाल्यानंतर १५ दिवसांत कर भरल्यास ५ टक्के सुटीचा लाभ घेता येणार असल्याचे डॉ. ढाकणे म्हणाले. 


काही ठिकाणी राष्ट्रीयकृत बँकेत बिल भरण्याची सोय करण्यासाठी संबंधित बँकेशी चर्चा सुरू असल्याची माहिती मुख्य लेखापाल कार्यालयाकडून देण्यात आली. शहर आणि हद्दवाढ भागात मिळून सुमारे दोन लाख मिळकती आहे. कर भरण्यासाठी महापालिकेत यावे लागते. या वर्षापासून हस्तलिखित बिलाची पावती बंद केल्याने, महापालिकेत कर भरण्यासाठी गर्दी होत आहे. 


ही गर्दी टाळण्यासाठी तसेच नागरिकांच्या सोयीसाठी शहरातील झोन कार्यालय, विविध बँकेत सोय करण्याचा निर्णय आयुक्त डॉ. ढाकणे यांनी घेतला. त्यानुसार एचडीएफसीच्या १० तर आयसीआयसीआयच्या ३ शाखेत कर भरण्याची सुविधा येत्या पंधरवड्यात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 


तर ३० हजार बिलावर थकबाकी लागली असती 
३० हजार बिलावर मागील बिले जमा केली नव्हती. बिले भरली असताना मागील थकबाकी लागून जाऊ नये, म्हणून मागील बिल जमा करून, नवीन बिले काढण्यास उशीर झाला. बिले वाटप करण्यास उशीर झाला. त्यामुळे नागरिकांना बिल हातात मिळाल्यावर १५ दिवसांपर्यंत ५ टक्के सुटीत भरता येईल. बिल देताना त्यावर तारखेचा शिक्का मारला जाणार नाही. नागरिकांना बिल मिळाले नसले तरी महापालिकेत येऊन मिळकतकर क्रमांकावरून बिल भरता येईल, असे महापालिका कर आकारणी विभागाकडून सांगण्यात आले. शहरात आतापर्यंत ८० हजार बिलाचे वाटप करण्यात आले. त्यामुळे ५ टक्के सुट मिळण्यासाठी नागरिकांनी पालिकेत गर्दी होत आहे. 


राष्ट्रीयकृत बँकेत का नाही? 
मिळकत कर भरण्यासाठी खासगी बँकेत सोय करण्यात आली. पण राष्ट्रीय बँकेत का नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत बोलताना महापालिका मुख्य लेखापाल शिरीष धनवे म्हणाले, सर्व बँकांशी बोलणी सुरू आहे. खासगी बँकांनी मोफत सेवा दिली. २७ बँकेशी पत्रव्यवहार सुरू आहे. 


हद्दवाढ भागात सोय होणार 
हद्दवाढ भागातील नागरिकांना कर भरण्यासाठी ५ ते ११ किमी अंतरावरून महापालिकेत यावे लागते. आता नवीन सोयीमुळे त्या नागरिकांना त्या परिसरातील मनपा झोन किंवा बँकेत कर भरता येईल. मजरेवाडी, बाळे, विडी घरकुल, शेळगी, नीलम नगर, अशोक चौक, नेहरू नगर यासह अन्य ठिकाणी सोय करण्यात येणार आहे. 


नागरिकांची सोय करण्याचा प्रयत्न 
नागरिकांना महापालिकेत कर भरण्यासाठी लांबून येऊ लागू नये म्हणून एचडीएफसी आणि आयसी आयसीआय बँकेत सेवा सुरू करण्यात येत आहे. महापालिकेच्या वतीने काही ठिकाणी सोय करण्यात येणार आहे. 
- डाॅ. अविनाश ढाकणे, मनपा आयुक्त 

बातम्या आणखी आहेत...