Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | Number of ST passengers dropped by 55 thousand due to effect of Maratha agitation

मराठा आंदोलनाचा परिणाम, एसटी प्रवाशांची संख्या ५५ हजारांनी घटली

प्रतिनिधी | Update - Aug 02, 2018, 12:13 PM IST

मराठा आरक्षण आंदोलनाचा जबर फटका एसटीला बसला. यंदाच्या वर्षी दगडफेकीच्या भीतीमुळे तब्बल ५५ हजार ९२५ वारकऱ्यांनी एसटीने प्

 • Number of ST passengers dropped by 55 thousand due to effect of Maratha agitation

  सोलापूर- मराठा आरक्षण आंदोलनाचा जबर फटका एसटीला बसला. यंदाच्या वर्षी दगडफेकीच्या भीतीमुळे तब्बल ५५ हजार ९२५ वारकऱ्यांनी एसटीने प्रवास करणे टाळले आहे. तर १ हजारहून अधिक गाड्या आंदोलनामुळे पंढरपुरात पोहोचूच शकल्या नाहीत. मागच्या वर्षीच्या तुलनेने प्रवासी उत्पन्नात वाढ झाली असली तरी प्रवासी संख्या मात्र घटलेली आहे.


  १८ ते २७ जुलैदरम्यान एसटी प्रशासनाने पंढरपूरसाठी राज्यातून जवळपास ३७०० गाड्यांचे नियोजन केले होते. यात पुणे, नाशिक, औरंगाबाद आदी विभागांच्या गाड्यांचा समावेश होता. मागच्या वर्षीच्या गाड्यांच्या संख्येत वाढ झाली होती. मात्र प्रत्यक्षात एक हजाराहून अधिक गाड्या धावूच शकल्या नाहीत. याचा परिणाम भारमान वाढणाऱ्यावर झाला आहे. तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वी एसटी प्रशासनाने तिकीट दरात १८ टक्के केलेली दरवाढ आहे. या दोन्हीचा परिणाम उत्पन्नावर झालेला आहे.


  वारी यंदाच्या वर्षी
  > ३७०० गाड्यांच्या माध्यमातून राज्यात १५२८७ फेऱ्या.
  > ३६ लाख ०३ हजार १५७ किमीचा प्रवास.
  > ६ लाख ७५ हजार ०८१ वारकऱ्यांनी प्रवास केला
  > १७ कोटी ३० हजार ७८१ रुपयांचे उत्पन्न मिळाले.

Trending