आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG: रोज 3 ते 4 लिटर दुध फस्‍त करतात या कोंबड्या, शेतक-यांसह पशुवैदकीय अधिकारीही अवाक्

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माढा (सोलापुर) - दुध हे कोंबड्यांचे खाद्य नाही. त्‍यामुळे कोंबड्या दुध पितानाचे चित्र सहसा कुठे दिसत नाही. मात्र माढा तालुक्‍यातील उदरंगाव येथे आतापर्यंतचा हा समज खोटा ठरत आहे. येथील एका शेतक-याच्‍या 10 ते 12 कोंबड्या दुध पिऊन फस्‍त करत आहे. पशुवैदकीय अधिका-यांनीही हा प्रकार प्रथमच पाहायला मिळत असल्‍याचे सांगितले आहे तर परिसरातील शेतक-यांमध्‍येही सध्‍या याचीच चर्चा आहे.

 

दुध दरवाढीकरिता पुकारलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्यव्यापी दुध बंद आंदोलनात उदरंगावचे तरुण शेतकरी केतन मस्केदेखील सहभागी झाले आहेत. दररोज निघणारे 30 लिटर दुध दुधसंकलन केंद्रात न पाठवता ते या संपात सहभागी झाले. दररोजचे निघालेले दुध ते शेतात व परिसरात असलेल्या कोंबडी व कोंबड्यांसाठी ठेवतात. विशेष म्हणजे या कोबड्यां दररोज हे दुध पिऊन फस्त करीत आहेत. हे पाहून स्‍वत: केतनदेखील आवाक झाले.


आता तर परिस्थिती अशी आहे की, धार काढत असतानादेखील या कोंबड्या दररोज केतन याच्यां जवळ गोंडा घालतात. या कोंबड्या दुध पित असतानाचा व्हिडिओ सध्‍या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मस्के दररोज 3 ते 4 लिटर दुध या कोंबड्यांसाठी आता ठेवत आहेत. उर्वरित दुध ते गावातील गोरगरिबांना घरी जाऊन देत असुन ज्या घरी दिंडी व वारकरी आहेत त्याच्यां घरीदेखील ते दुध देतात. यापुढील काळातही या कोंबड्यांना दररोज दुध ठेवणार असल्याचे केतन मस्के यानी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले.

 

हे प्रथमच ऐकायला मिळाले
कोबड्या अथवा कोबंड याचे  दुध हे खाद्य नाही.विशेषत:ह हे दुध कधि पित नाही.आपण जे सांगताहेत ते  मला प्रथमच ऐकावयास मिळाले आहे.यामागे त्या  शेतकर्याचा लळा देखील लागला असेल.दुध कोंबड्या पिल्याना काही अपाय होत नाही.

- डॉ. कैलास कचवे, माढा तालुका पशुवैद्कीय अधिकारी

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, कोंबड्या दुध पित असतानाचे फोटो...

 

 

बातम्या आणखी आहेत...