आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहकारमंत्री सुभाष देशमुख गटाविरोधात सर्वपक्षीय एकजूट, नेते V/S कार्यकर्ते असा रंगणार सामना...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- बाजार समिती निवडणुकीत काँग्रेस विरोधात भाजप अशी लढत होण्याची अपेक्षा फोल ठरत खुद्द भाजपचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी काँग्रेस गोटातील सिद्धेश्वर पॅनलमधून निवडणूक लढवत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व भाजप अशा सर्वपक्षीय नेत्यांचा समावेश असलेल्या सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनलविरोधात सहकारमंत्री गटाच्या श्री सिद्धरामेश्वर शेतकरी परिवर्तन पॅनल लढत होणार आहे. एकीकडे दिग्गज उमेदवारांच्या पॅनलशी नवीन चेहरे असलेल्या सहकारमंत्री सुभाष देशमुख गटाचे उमेदवार यांच्यात सामना होणार आहे. मतांची विभागणी होण्यासाठी काही गणांमध्ये अपक्षांचे आव्हान असणार आहे. 


मंगळवारी दक्षिण तहसील कार्यालयात अर्ज माघारीसाठी सूचक व उमेदवारांनी गर्दी केली होती. दुपारी दोननंतर कार्यालयात सर्वच पक्षाच्या नेत्यांसह उमेदवारांची मोठी गर्दी झाली होती. ८१ उमेदवारांपैकी शेतकरी मतदारसंघातील ३० उमेदवारांमध्येच मुख्य लढत होणार आहे. निवडणूक रिंगणातील ३५ उमेदवार अपक्ष आहेत. हमाल-तोलार मतदारसंघातून सर्वाधिक ११ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. 


कळमण मतदारसंघातून १४ पैकी ११ उमेदवारांनी माघार घेतल्याने जितेंद्र साठे व संग्राम पाटील यांच्यात मुख्य लढत असून शहाजी मते अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. नान्नज मतदारसंघामध्ये १८ पैकी १५ जणांनी माघार घेतली आहे. इंद्रजित पवार यांना प्रकाश चौरेकर यांचे आव्हान असणार आहे. 


तिसरे उमेदवार जावेद पटेल अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. पाकणी मतदारसंघात २४ पैकी २२ जणांनी माघार घेतल्याने सुनील गुंड विरोधात प्रकाश वानकर अशी सरळ लढत होणार आहे. मार्डी मतदारसंघात १४ पैकी ११ जणांनी माघार घेतल्याने तीन उमेदवार रिंगणात आहेत. राजेंद्र गिरे आणि नामदेव गवळी यांच्या मुख्य लढत रंगणार असून प्रकाश गावडे हे अपक्ष उमेदवार नशीब अजमावत आहेत.अनुसूचित जातीसाठी राखीव बोरामणी गणामध्ये विश्रांत गायकवाड विरोधात राजू वाघमारे अशी लढत राहणार आहे. प्रमोद गायकवाड, अमृत बनसोडे, मिलिंद मुळेसह सहाजण अपक्ष निवडणूक लढवित आहेत. महिलांसाठी राखीव बाळे गणामध्ये नगरसेविका मेनका राठोड व विजया भोसले यांच्यात मुख्य लढत राहील तर शांता भंवर या अपक्ष म्हणून निवडणुकीला समोरे जात आहेत. हिरज मतदारसंघातून १३ पैकी ११ जणांनी माघार घेतल्याने माजी आमदार दिलीप माने यांची लढत त्यांचेच कार्यकर्ते असलेले पण आता भाजपवासी झालेले माजी सरपंच श्रीमंत बंडगर यांच्याशी होणार आहे. 

 

लाखाेंचा अपहार केला 
सोलापूर बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार दिला आहे. बाजार समितीद्वारे शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी आम्ही निवडणूक लढवित आहोत. आतापर्यंत ज्यांनी शेतकऱ्यांच्या बाजार समितीत लाखोचा अपहार केला, तेच आता निवडणुकीद्वारे मते मागत आहेत. ज्यांनी लाखो रुपयांचा अपहार केला, ती अपहाराची रक्कम भरल्यास आम्ही त्यांना बिनविरोध करू. दोन्ही पॅनलमधील उमेदवार पाहता ही निवडणूक नेत्याविरोधात कार्यकर्ते अशी आहे. 
- शहाजी पवार, जिल्हाध्यक्ष 


मताच्या अधिकाराने पोट भरत नाही... 
भाजप सरकारने शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार दिला, पण त्यामुळे त्यांचे पोट भरत नाही. गेल्या चार वर्षात शेतमालास भाव न मिळाल्याने आजही शेतकरी संकटात आहे. शेतकऱ्यांनी विश्वास दाखविल्याने सोलापूर बाजार समिती आज राज्यात चौथ्या क्रमांकावर आहे. जी आश्वासने दिली आहेत, ती पूर्ण करा मगच मते मागा. आम्ही सर्व उमेदवार ताकदीचे दिले आहेत. शिवाय खुद्द पालकमंत्री आमच्या पॅनलमधून लढत आहेत. संपूर्ण पॅनल विजयी होईल.
- सिद्धाराम म्हेत्रे, आमदार पॅनलप्रमुख. 

 

व्यापारी मतदारसंघातील उमेदवार - बसवराज इटकळे, सिद्धाराम कोतली, सिद्रामप्पा हुलसुरे, केदार उंबरजे, म. इब्राहिम मैंदर्गीकर. 


हमाल-तोलार - शिवानंद पुजारी,मल्लिनाथ जेंडगे-पाटील, मुतप्पा कोळी, सुनीता रोटे, दीपक गदगे, रामय्या स्वामी, राहुल बनसोडे, इरफान पिरजादे, विठ्ठल पुजारी,राजशेखर माळगे, अ.जब्बार चाँदगफार. 


गणातील इतर अपक्ष उमेदवार... कळमण - शहाजी मते, नान्नज - जावेद पटेल, मार्डी - प्रकाश गावडे, बोरामणी - अमृत बनसोडे, गणेश कांबळे, प्रमोद गायकवाड, मिलिंद मुळे, रवींद्र जाधव, नागनाथ शिंदे, बाळे - शांता भंवर, कुंभारी - सिद्धाराम चाकोते, विश्वनाथ शेगावकर, मळसिद्ध गुंडे, विजय हत्तुरे, सिद्धाराम भोरगुंडे, मुस्ती- सिद्रामप्पा पाटील, होटगी - हणमंत दिंडुरे, सिद्धाराम कोळीगार, अस्लम शेख, कणबस - हरीष पाटील, शिवानंद चिट्टे, शिवराया बिराजदार, शिवयोगप्पा बिराजदार, तमण्णा घोडके, मंद्रूप - शालन चव्हाण, रत्नाबाई पुजारी, विजयालक्ष्मी बिराजदार, कंदलगाव - मायप्पा व्हनमाने, शिवानंद झळकी, भंडारकवठे - रमेश हसापुरे, बसवराज बगले, औराद - सुरेश मळेवाडी, विजय गायकवाड, नागय्या स्वामी, शिवशरण वाले. 

बातम्या आणखी आहेत...