आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BrainDead महिलेचे मूत्रपिंड, यकृत, डोळे केले दान; ग्रीन कॉरिडाॅरने नेले अवयव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- अश्विनी रुग्णालय कुंभारी येथे एका ४८ वर्षीय महिलेचे दोन मूत्रपिंड, यकृत आणि दोन डोळे दान करण्यात आले. ही महिला उस्मानाबाद येथील असून तेथे दुसऱ्यांदा अवयव दान झाले. एक मूत्रपिंड व यकृत पुणे येथील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे ग्रीन कॉरिडॉर करून नेण्यात आले. दुसरे मूत्रपिंड अश्विनी रुग्णालय कुंभारी येथे यशस्वीपणे प्रत्यारोपण करण्यात आले. दोन डोळे नेत्रपेढीस दान केले. 


कौटुंबिक कार्यक्रमासाठी हनुमंत चव्हाण हे कसबेतडवळे येथे गेले होते. त्यांच्या पत्नी पुष्पलता चव्हाण (४५ ) याही सोबत होत्या. गुरुवारी (दि. २८) सायंकाळी पाच वाजता दुचाकीवरून परतत असताना पुष्पलता यांना चक्कर येऊ लागली. यामुळे त्यांनी दुचाकी थांबवून चालत येण्यास सांगितले. मात्र, चालत पुढे गेल्यानंतर अचानक त्या खाली कोसळल्या. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चव्हाण यांनी त्यांना शहरातील निरामय हॉस्पिटलमध्ये नेले. तेथे डॉ. विशाल वडगावकर व डॉ. सुश्रुत डंबळ यांच्या टीमने पुष्पलता यांच्या तपासण्या केल्या. मात्र, मेंदूवर मोठी सूज असल्याचे निदर्शनास आले. पराकोटीचे प्रयत्न करूनही मेंदूवरील सूज उतरली नाही. तेव्हा हा प्रकार ब्रेनडेडचा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. दोन्ही डाॅक्टरांनी चव्हाण यांना हा प्रकार सांगितला. तसेच अवयवदानासाठी समुपदेशन केले. 


सोलापुरात पार पडली प्रक्रिया, ग्रीन कॉरिडाॅरने नेले अवयव 
पुष्पलता यांचे दोन मूत्रपिंड, यकृत व दोन डोळे निष्णात डॉक्टरांच्या मदतीने काढण्यात आले. एक मूत्रपिंड सोलापूर येथील एका शिक्षकाला तातडीने देण्यात आले. तर दुसरे मूत्रपिंड व यकृत पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील रुग्णांसाठी नेण्यात आले. यासाठी खास ग्रीन कॉॅरिडॉरची व्यवस्था करण्यात आली होती. यातून तिघांना जीवनदान मिळाले. 


दानाचे समाधान 
माझी सहचारिणी व मुलींची आई गेल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मात्र, अवयवदानामुळे तिघांना जीवदान मिळाल्याचे समाधान वाटत आहे.
- हनुमंत चव्हाण, पोलिस हवालदार, बेंबळी. 

बातम्या आणखी आहेत...