आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यात मतदार यादीतून एकूण सव्वा लाख नावे वगळणार; धुमाळ यांची माहिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- जिल्ह्यात घरोघरी जाऊन मतदार तपासणी मोहीम पूर्ण झाली आहे. तपासणीमध्ये मृत, कायमस्वरूपी स्थलांतर, एकापेक्षा अधिक वेळा नावे असलेली अशी एकूण १ लाख २६ हजार ६२३ जणांची नावे मतदारयादीतून वगळण्यात येणार आहेत. वगळणी प्रक्रियेत प्रत्येकांना निवडणूक कार्यालयाकडून नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ यांनी दिली. 


घरोघरी तपासणी मोहिमेत ३२ हजार ६५० मतदार मृत तर २३ हजार ८२१ मतदार हे कायमस्वरूपी इतर ठिकाणी स्थलांतरित झाल्याचे निदर्शनास आले आहे. १४ हजार ३४८ मतदारांची नावे एकापेक्षा अधिक ठिकाणी तर आयोगाच्या सॉफ्टेवअरने केलेल्या पडताळणीत १ लाख ११ हजार ६०८ नावे एकापेक्षा अधिक ठिकाणी असल्याचे निदर्शनास आले आहे. यापैकी मतदार यादीमध्ये एका ठिकाणीच नाव ठेवून दुसऱ्या ठिकाणी असलेले नाव वगळण्यात येणार आहे. 


मृत मतदारांची तालुकानिहाय आकडेवारी पाहता पंढरपूर मतदारसंघात ६४७५ तर सोलापूर शहर मध्य मतदारसंघात ४५३४ मतदार मृत आहेत. शहर मध्य मतदारसंघातील सर्वाधिक ६ हजार ९६४ मतदार कुटुंबांनी स्थलांतर केले आहे. त्याखालोखाल सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातील ५ हजार २४४ कुटुंब स्थलांतरित झाल्याचे दिसते. यामुळे सध्या वास्तव्यास नसल्याने ही नावे मतदार यादीतून वगळण्यात येणार आहे. तशी नोटीस ते राहत असलेल्या जुन्या घरावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 


९.९३ लाखापैकी ९.१२ लाख घरांची तपासणी 
३ हजार २९० मतदार केंद्र अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील १० लाख ९३ हजार १६३ पैकी ९ लाख १२ हजार २४० घरांची तपासणी केली आहे. यामध्ये करमाळा तालुक्यात ८८ हजार २५१, माढा तालुक्यात ९९ हजार २२१, बार्शी तालुक्यात १ लाख १६ हजार ७९०, मोहोळ ६५ हजार ७५, शहर उत्तर मतदारसंघात ७९ हजार ६५२, शहर मध्य मतदारसंघातील ७७ हजार ५३५, अक्कलकोट ७७ हजार ३१९, दक्षिण सोलापूर ६२ हजार ८२९, पंढरपूर तालुक्यातील ७५ हजार ६०४, सांगोला तालुक्यातील ७६ हजार ९०४ व माळशिरस तालुक्यातील ९३ हजार ६० घरांमध्ये प्रत्यक्ष जाऊन मतदारांची माहिती नोंदविण्यात आली आहे. शहर मध्य ८५ टक्के तर दक्षिण सोलापूर ८८ टक्के वगळता इतर सर्व मतदारसंघातील ९० टक्केहून अधिक घरांतील मतदारांची माहिती नोंदविण्यात आली आहे. 


मृत, स्थलांतरित मतदार 
करमाळा ६५८८, माढा १४२०, बार्शी ९०४, मोहोळ ४५९९, सोलापूर शहर उत्तर ९१४३, सोलापूर शहर मध्य ११४९८, अक्कलकोट १६५९, दक्षिण सोलापूर ४४२०, पंढरपूर ८१९५, सांगोला ५१८०, माळशिरस २८६५. एकूण ५६ हजार ७४१. 

बातम्या आणखी आहेत...