आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती अध्यक्ष डॉ.अतुल भोसले यांना मंत्रिपदाचा दर्जा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरपूर -  श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ.अतुल भोसले यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातील अध्यादेशावर सोमवारी स्वाक्षरी केली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे पारंपारिक राजकीय विरोधक म्हणून कराडमध्ये भोसले घराणे प्रसिध्द आहे. त्यामुळे मागील निवडणुकीतील लढत लक्षात घेता आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन डॉ.भोसले यांचे राजकीय बळ वाढवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिल्याचे बोलले जाते. 


गेल्या आषाढीला कराडचे भाजप नेते डॉ.अतुल भोसले यांची राज्य शासनाने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. त्यानंतर भोसले यांनी घेतलेल्या काही निर्णयांची  अंमलबजाणी कागदावरच आहेत. दर्शनासाठी तिरुपती व शिर्डी प्रमाणे टोकन पध्दत, मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग आणि चंद्रभागेचे वाळवंट नियमीत स्वच्छ रहावे येथील पालिकेवरील स्वच्छतेच्या कामाचा बोजा कमी व्हावा या दृष्टीने मंदिर समिती मार्फत स्वच्छतेसाठी डॉ. भोसले यानी  पुढाकार घेऊन ठेकेदाराची नियुक्ती करून प्रत्यक्ष कार्यवाही सुरू केली आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...