आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हुतात्मा एक्स्प्रेसला नाही जोडता येणार पॅन्ट्री; नवीन केटरिंग पॉलिसीचा विचार सुरू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- देशात पॅन्ट्री कारची कमतरता असल्याने सोलापूर -पुणे धावणाऱ्या हुतात्मा एक्स्प्रेसला पॅन्ट्री कार जोडता येणार नाही. मात्र प्रवाशांना चांगल्या दर्जाचे तसेच माफक दरात खाद्यपदार्थ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. रेल्वे बोर्ड केटरिंग पॉलिसीमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल करणार आहे. तेव्हा याचा आधार घेत रेल्वे प्रशासन हुतात्मा एक्स्प्रेसमध्ये अधिकृत विक्रेता नेमण्याच्या तयारीत आहे. तो प्रवाशांना चांगल्या दर्जाचे खाद्यपदार्थ उपलब्ध करून देईल. त्याच्या दर्जाची संपूर्ण जबाबदारी विक्रेत्याची असणार आहे. त्यांच्यावर रेल्वेचे नियंत्रण राहणार आहे. 


गेल्या अनेक वर्षापासून सोलापूरकरांची हुतात्मा एक्स्प्रेसला पॅन्ट्री कार जोडण्याची मागणी आहे. ही मागणी पूर्ण होणार नसल्याचे आता स्पष्ट झाले. सध्या हुतात्मा एक्स्प्रेसमधून अनधिकृत विक्रेत्यांकडूनच खाद्यपदार्थ पुरविले जाते. रेल्वेने खाद्यपदार्थांबाबत कुठलीच सोय न केल्याने प्रवाशांना अशा विक्रेत्यांकडून खाद्यपदार्थ घ्यावे लागतात. याच्या दर्जाबाबत व सेवेबाबत अनेकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले. मात्र त्या प्रश्नांना आजतागायत उत्तर मिळाले नाही. येत्या काही दिवसांत रेल्वे प्रशासन हुतात्मा एक्स्प्रेसमध्ये अधिकृत विक्रेता नेमणार आहे. 


वाशिंबे -जेऊर स्थानकादरम्यान सुरू असलेल्या खडी बदलण्याच्या कामामुळे इंद्रायणी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली. प्रवाशांची गैरसोय कमी व्हावी म्हणून सोलापूर रेल्वे प्रशासनाने हुतात्मा, पुणे -भुसावळ एक्स्प्रेस, सिद्धेश्वर व उद्यान एक्सप्रेसच्या कोचेस संख्येत वाढ केली होती. त्या कोचचा कालावधी १ फेब्रुवारीला संपणार होता. तत्पूर्वी सोलापूर प्रशासनाने जोडलेल्या अतिरिक्त कोचेसचा कालावधी पुन्हा एक महिन्याने वाढविला आहे. त्यामुळे प्रवाशांची सोय होईल. 


हुतात्मा एक्स्प्रेसला पॅन्ट्री कार जोडणे शक्य नाही. मात्र प्रवाशांना चांगल्या दर्जाचे खाद्यपदार्थ मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील. अधिकृत विक्रेत्यांना नेमण्याचा विचार सुरू आहे. या संबंधीचा आदेश प्राप्त होताच याची अंमलबजावणी सुरू केली जाईल.
- हितेंद्र मल्होत्रा, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, सोलापूर 

बातम्या आणखी आहेत...