आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंढरपूरनंतर आता माढ्यातही पासपोर्ट कार्यालय होणार, राज्यात नवीन पाच कार्यालयांना मंजुरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माढा (सोलापूर)- सोलापूर येथे सुरु करण्यात आलेल्या पासपोर्ट कार्यालयानंतर आता माढा शहरात ही पासपोर्ट कार्यालय लवकरच सुरु होणार आहे. माढ्याबरोबरच राज्यात नवीन चार कार्यालयांना मंजूरी दिली आहे यात अकोला,अमरावती,चंद्रपुर,बारामती या शहरांचा समावेश आहे. याबाबतची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रधान सचिव ज्ञानेश्वर मुळे यानी गुरुवारी सकाळी अकरा वाजता जाहीर केली. याआधी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे पासपोर्ट कार्यालयाला मंजूरी मिळाली असून ते मे अखेरीस सुरु होण्याची शक्यता आहे. 

 

माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील यानी माढ्यात पासपोर्ट कार्यालय सुरू व्हावे याकरिता एक वर्षापासून पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे. माढ्यात पासपोर्ट कार्यालय सुरु होणार असल्याने परदेशात जाण्यास इच्छुक असलेल्यांना तात्काळ पासपोर्ट मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.यामुळे माढा तालुक्यासह माढा लोकसभा मतदार संघातील नागरिकांना याचा मोठा फायदा होणार असुन वेळेचा अपव्यय टळणार आहे. 


माढ्याच्या वैभवात भर पडणार
माढा शहर हे तालुक्याचे ठिकाण असुन या गावची लोकसंख्या जवळपास चौदा हजार इतकी असुन येथे नगरपंचायत आहे. मात्र तालुक्याचे ठिकाणी असताना देखील म्हणावी असे शहर विकसित झालेले नाही. शिवाय माढा तहसिल कार्यालय व दिवाणी न्यायालयाव्यतिरिक्त येथे मोठे शासकीय कार्यालय नाही. माढा पंचायत समिती कार्यालय, माढा कृषी उत्पन्न बाजार समिती, प्रांत कार्यालय, कुडूवाडी रेल्वे जंक्शन हे सर्व कुर्डूवाडीतच आहेत. आता पास पोर्ट कार्यालय माढ्यात सुरु होणार असल्याने माढ्याच्या बाजारपेठेला चालना मिळणार असुन शहराच्या वैभवात निश्चित भर पडणार आहे.

 

येत्या सहा  महिन्याच्या आत कार्यालय सुरु

पास पोर्ट कार्यालय माढ्यात होणार असल्याने माढा शहरातील पोस्ट कार्यालयाची प्रथमत: पथक येऊन  पाहणी करुन आवश्यक जागा कार्यालयासाठी  आहे का याची पाहणी केली जाणार आहे. आवश्यक जागा पोस्ट कार्यालयात नसल्यास नविन इमारत या कार्यालयासाठी उभारली जाणार आहे .हे कार्यालय येत्या सहा महिन्यांच्या आता उभारले जाणार आहे. 2019 वर्षात लोकसभा निवडणुका होणार असल्याने त्या अगोदरच हे कार्यालय सुरु होईल.

 

गैरसोय टळणार
पासपोर्ट काढण्यासाठी बाहेर गावी जावे लागत होते. यासाठी एक दिवसाचा वेळ जात होता. पासपोर्ट कार्यालय माढ्यात होणार असल्याने मोठी सोय झाली आहे. यामुळे माढा शहर विकसीत होईल.-प्रविण चवरे, नागरिक


पाठपुराव्याला अखेर यश
पासपोर्ट कार्यालय माढ्यात व्हावे याकरिता मी गत एक वर्षापासून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे मंत्री सुषमा स्वराज याच्याकडे आवश्यक कागदपत्रे देऊन वारंवार पाठपुरावा करीत आलो आहे. याकामी नागरिकांची मोठी गैरसोय होत होती.माढ्यातील पोस्ट कार्यालय अथवा नविन इमारत याकरिता उभा केली जाणार आहे. लवकरात लवकर कार्यालय सुरु होईल- खासदार विजयसिंह मोहिते पाटील, माढा लोकसभा मतदारसंघ

बातम्या आणखी आहेत...