आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेट्रोल पोहोचले Rs 86 वर; सोलापूर शहरात आतापर्यंतचा उच्चांक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - शहरातील पेट्रोल दराने आजपर्यंतचा उच्चांक गाठला. बुधवारी पेट्रोल प्रतिलिटर ८६ रुपये होते. आजतागायत पेट्रोलच्या दरांनी सोलापुरात ८६ रुपयांचा आकडा कधीच गाठला नव्हता. कर्नाटक राज्यातील निवडणुकीनंतर देशात रोज पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ होत आहे. २४ एप्रिल ते १३ मेदरम्यान पेट्रोलचा दर ८३.४८ रुपयांवर स्थिर होते.


मागील दहा दिवसांपासून सातत्याने दरात वाढ होत असल्याने सर्वसामान्यांचा याचा चांगलाच फटका बसत आहे. यामुळे महागाईदेखील वाढणार आहे. रोजच्या विक्रीप्रमाणेच दरवाढीच्या काळात पेट्रोल व डिझेलची विक्री सुरू आहे, अशी माहिती विक्रेत्यांनी दिली.

 

बातम्या आणखी आहेत...