आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रकाश आंबेडकर सोलापुरातून लोकसभा निवडणूक लढवणार? भारिप बहुजन महासंघाचे मुख्य संपर्क कार्यालय सुरू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याच्या हालचाली आहेत. त्यासाठी शहर व जिल्ह्याचे मुख्य संपर्क कार्यालय सुरू झाले. त्याचे उद्घाटन स्वत: अॅड. आंबेडकर यांनी केले. त्यानंतर झालेल्या चर्चेतून निवडणूक लढवण्यास त्यांनी सकारात्मकता दर्शवल्याचे वंचित बहुजन आघाडीप्रमुख अर्जुन सलगर म्हणाले.

 

उद्घाटनानंतर बोलताना अॅड. आंबेडकर म्हणाले, "निवडणुका जवळ येत आहेत. कार्यकर्त्यांनी पक्षाच्या कामात झोकून द्यावे. प्रमुख पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांच्या बैठका घ्याव्यात. गावोगावी पक्षाचे जाळे विणावे. अांबेडकरी चळवळ रूजवावी. सामान्य कार्यकर्त्याला संधी द्यावी. पक्षाच्या प्रदेश कार्यालयाकडून येतील त्या सूचनांचे पालन केले पाहिजे. पक्ष बळकट करून ताकद दाखवली पाहिजे. केवळ राजकारण न करता, समाजकारण केले पाहिजे."

 

या वेळी श्रीशैल गायकवाड, अर्जुन सलगर, अमित गायकवाड, अॅड. राकेश घाडगे, प्रशांत गोणेवार, कमलाकर कांबळे, सचिन तळभंडारे, किरण डोळसे, विश्वास धेंडे, किशोर डोमणे, आर्य मौर्य, फुलचंद इंगळे, वामन जगताप, समता सैनिक दलाचे जिल्हाप्रमुख विजय साळवे, जिल्हा सचिव यशवंत साबळे आदी उपस्थित होते. आशितोष गायकवाड यांनी आभार मानले.

 

आज बैठक
पक्षाच्या कार्यकर्त्यांची रविवारी शासकीय विश्रामगृहात बैठक बोलावली आहे. तीत 'वन बूथ, टेन यूथ' या संकल्पनेची माहिती देण्यात येणार आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे.
- अर्जुन सलगर, वंचित बहुजन आघाडी

 

बातम्या आणखी आहेत...