आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वालचंदच्या प्राध्यापकांनी दुर्मिळ औषधी वनस्पतीचा लावला शोध; आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- काळी मुसळी ही औषधी गुणधर्म असणारी वनस्पती. तुळजापूर तालुक्यातील अपसिंगा येथे या वनस्पतीची प्रजात संशोधकांना आढळली. अधिक संशाेधनानंतर हे सिद्ध झाल्याने या वनस्पतीच्या प्रजातीला या संशोधकांचे नावही मिळाले आहे. वालचंद महाविद्यालयातील वनस्पतीतज्ज्ञ प्रा. डॉ. सयाजीराव गायकवाड व डॉ. आर. डी. गोरे या गुरू- शिष्य प्राध्यापकांनी हे नवे संशोधन आंतरराष्ट्रीय पातळीवर सिद्ध केले आहे. त्याबाबतचा प्रबंध आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित केला. 


करक्युलिगो जनार्थनमई हायपोक्सीडेसई महाराष्ट्र - रामचंद्र गोरे, सयाजीराव गायकवाड असे या वनस्पतीच्या नव्या प्रजातीला नाव देण्यात आले आहे. बोली किंवा स्थानिक भाषेत या नव्या वनस्पतीस काळी मुसळी असे नामसंदर्भ आहे, असे संशोधक डॉ. गायकवाड यांनी सांगितले. डॉ. गायकवाड यांनी वनस्पतीशास्त्रातील संदर्भ ग्रंथ, स्पेसीमन उर्वरित पान 


करक्युलिगो जनार्थनमि नाव कसे पडले... 
डॉ. गायकवाड यांनी तब्बल सोळा नव्या वनस्पती, त्यांच्या प्रजातीचे संशोधन करून आंतरराष्ट्रीय पातळीवरील वनस्पती इंडेक्समध्ये नव्याने वर्गीकरण केले. नवी प्रजात शोधली तर त्यास मुख्य वनस्पतीच्या नावापुढे व प्रजातीच्या नावा आधी नाव देण्याचा संशोधकाला हक्क असतो. कारण ही प्रजात शोधण्याचा जनक म्हणून हे नाव देतात. पण जगभरातील सर्व वनस्पतींची नावे ही फक्त लॅटीन भाषेतच दिली जातात. नव्याने शोधलेल्या या वनस्पतीला डॉ. जनार्धन या गुरू स्थानी असलेल्या वनस्पतीतज्ज्ञाचे नाव डॉ. गायकवाड यांना द्यावयाचे होते, तसे ते दिले गेले. मात्र लॅटीन भाषेत जनार्धन यांचे नाव करक्युलिगो जनार्थनामि असे झाले. तेच नाव अंतिम दिले गेले. यातील सुरवातीचे करक्युलिगो हे नाव या वनस्पतीची मूळ जात आहे. यानंतर ती कुठे आढळली व त्यांचा शोध लावणारे असे पूर्ण नाव या वनस्पतींना दिले जाते. आंतरराष्ट्रीय पातळीवर याच पद्धतीने लॅटीन भाषेतच वनस्पतींना नावे दिली जातात. ती शास्त्रीय नावे असतात. अधिक माहितीसाठी डॉ. गायकवाड ९८९००३३३१० या भ्रमणध्वनीवर संपर्क साधता येईल. या वनस्पतीतील औषधी गुणधर्माचा अभ्यास करण्यासाठी आणखी वाव आहे. मात्र हे संशोधन फार्मसी ज्ञान शाखेच्या अंतर्गत होऊ शकते. 

बातम्या आणखी आहेत...