आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मलेशियातून वाळू आणण्याचा प्रस्ताव विचाराधीन, मे अखेरपर्यंत पर्याय शोधू: महसूल मंत्री पाटील

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- हरित लवादाच्या नियमामुळे वाळूचा लिलाव करता येणे शक्य नाही. आपल्याला पुरेलएवढा वाळू साठा उपलब्ध नाही. वाळूला पर्याय म्हणून दगडाचे क्रस्ट किंवा ऊर्जा प्रकल्पातील राख हा पर्याय शोधला जात आहे. गडचिरोलीची वाळू रेल्वेने आणण्याचा प्रयत्नही होत आहे. इतकेच नव्हे तर आंध्र, तेलंगणाप्रमाणे मलेशियातून वाळू आणण्याचा करारही विचाराधीन आहे. त्यामुळे मे अखरेपर्यंत वाळूचा पर्याय शोधला जाईल, असे मत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील सोलापुरात पत्रकार परिषदेत व्यक्त केले. 


ते म्हणाले, हरित लवादाच्या नियमामुळे अनेक वाळूंच्या ठेक्यांचा लिलाव करता येणे शक्य नाही, तसेच ज्या ठेक्यांचा लिलाव करता येतो त्यात वाळूचा साठा पुरेसा नाही. वाळूचा बेकायदा उपसा होऊ नये, अवैध वाहतूक होऊ नये यासाठी कडक धोरण आखण्यात आले आहे. पोलिस यंत्रणा अपुरी असल्यामुळे खासगी सुरक्षा यंत्रणा नेमण्याचीही मंजुरी देण्यात आली आहे. बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या ट्रकला पाच लाख रुपये दंड आहे. 


सदनिका हस्तांतरण शुल्कात शिथिलता 
सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या सदनिका, गाळा यांच्या हस्तांतरण शुल्कात शिथिलता आणली. हा दर पूर्वी दुप्पट होता. तो परवडणार नसल्याच्या तक्रारी शासन दरबारी आल्या. 

बातम्या आणखी आहेत...