आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माढा तालुक्‍यात दुध बंद आंदोलनास मोठा प्रतिसाद, टेम्‍पो अडवून दुधाच्‍या पिशव्‍या फेकल्‍या, रस्‍त्‍यावर हजारो लिटर दुधाचा सडा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माढा (सोलापुर) - तालुक्यात दुध दरवाढीच्‍या विरोधात सुरू असलेल्‍या दुध बंद आंदोलनास दुस-या दिवशीही मोठा प्रतिसाद मिळाला. मंगळवारी संध्‍याकाळी पावणे सहाच्या सुमारास बार्शी कुर्डूवाडी मार्गावरील रिधोरे येथे नेचर डिलाईटचे टेम्पो अडवून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व दुध उत्पादक शेतकर्यांनी दोन टेम्पो मधील दुधाच्या पिशव्या ट्रे सह रस्त्यावर फेकुन दिल्या. यामुळे हजारो लिटर दुधाच्या पिशव्या पायदळी तर तुडविल्या गेल्‍याच शिवाय या दुधाच्या पिशव्यांवरुन वाहने देखील गेली. यामुळे रस्‍त्‍यावर दुधाचा सडा पडल्याचे चित्र दिसुन आले.


तसेच रिधोरे गावातील व परिसरातील नागरिकांनी दुधाच्या पिशव्या घेऊन जाण्यासाठी मोठी गर्दी केली होती. दुधाच्या पिशव्या घरी घेऊन जाण्यासाठी मोठी धावपळ सुरु असल्याचे चित्र दिसुन आले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व शेतकर्यानी मुख्यमंत्री फडणवीस व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर याच्यां विरोधात  घोषणाबाजी केली.


दुध आंदोलनाची पहीली ठिणगी देखील रिधोरे या गावातुनच रविवारी रात्री  पडली होती. माढा तालुक्यात स्वाभिमानीच्या आंदोलनास मोठा प्रतिसाद मिळत असुन शेतकरी उत्स्फूर्त पणे सहभाग नोंदवत आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. शेतकरी दुध आटवण्याचा पर्याय स्वीकारत आहेत. माढा तालुक्यातुन प्रतिदिन जाणारे जवळपास दोन लाख लिटर दुधाचे संकलन ठ्प्प झाले आहे. दुधाचे माहेर घर म्हणुन ओळख असलेल्या कुर्डू गावात 25 हजार लिटर तर लऊळ मध्ये 17 हजार लिटर दुध संकलन ठ्प्प झाले आहे. माढ्यातही मंगळवारी सकाळी दुध उत्पादक शेतकर्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात दुधाचे वाटप केले.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटो...

 

बातम्या आणखी आहेत...