आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संविधान बदलाची भाषा करणाऱ्या हेगडेंच्या पुतळ्याचे मुरुममध्ये दहन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उमरगा - केंद्रीय कौशल्य विकास राज्यमंत्री अनंत हेगडे यांच्या ‘भाजप सरकार संविधान बदलण्यासाठीच सत्तेत आले आहे’, या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ शुक्रवारी (दि.२९) तालुक्यातील मुरुम शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.

 

छत्रपती शिवाजी महाराज चौकात हेगडे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. यानंतर भीमराज ग्रुपच्या नेतृत्वात समाजबांधवांनी सहाय्यक पोलिस निरीक्षकांना निवेदन देऊन हेगडे यांच्यावर कारवाईची मागणी केली. राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे यांनी २४ डिसेंबरला संविधानासंबंधी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याचे संसदेच्या दोन्ही सभागृहात तीव्र पडसाद उमटले. हेगडे यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली होती. निवेदनानुसार हेगडे यांनी संविधानाचा अपमान केला केला असून समाजबांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. राज्यमंत्री हेगडे यांनी देशद्रोह केला असून राष्ट्रीय, सामाजिक ऐक्य धोक्यात आणण्याचा प्रयत्न केला आहे, असे निवेदनात म्हटले आहे. कुणीही असे वक्तव्य करण्यास धजावू नये, यासाठी न्यायव्यवस्था शासनव्यवस्थेने दक्षता घ्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

 

बाजारपेठ बंद
राज्यमंत्रीहेगडे यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ मुरूम येथील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. यावेळी भीमराज ग्रुपचे अध्यक्ष आनंदकुमार कांबळे, शहराध्यक्ष सूरज कांबळे, राहुल कांबळे, किरण गायकवाड, प्रणित गायकवाड, गोपी कांबळे, हिरालाल गायकवाड, प्रशांत मुरुमकर यांच्यासह सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते निषेध मोर्चात सहभागी झाले.

 

परंडा येथेही निषेध
केंद्रीयराज्यमंत्री अनंतकुमार हेगडे यांनी संविधान बदलाबाबत केलेल्या बेजबाबदार वक्तव्याच्या निषेधार्थ त्यांना पदावरून हटवण्याची मागणी येथील दलित समाजाने तहसीलदारांना निवेदनाद्वारे केली. सात दिवसांत कारवाई केल्यास संविधानप्रेमी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा इशारा दिला आहे. निवेदन देताना राहुल बनसोडे, नागसेन चौतमहाल, अविनाश बनसोडे, अजय दनाने, अमित बनसोडे, विश्वास बनसोड, दीपक चौतमहाल, साजन बनसोडे, बाबा भोसले, निवांत बनसोडे, लखन दनाने, नागेश लोहार उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...