आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्लास्टिक व थर्माकोल विरोधात जनजागृती; जिल्ह्यात २८ जून ते १६ जुलै दरम्यान विविध कार्यक्रम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- प्लास्टिक व थर्माकोल विरोधात गावपातळीवर जागृती व ठोस कृतीधोरण राबविण्याबाबत जिल्हा परिषदेतर्फे २८ जून ते १३ जुलै दरम्यान प्लास्टिकमुक्त स्वच्छता पंधरवडा आयोजिला आहे. तसेच, पंधरवड्यानिमित्त शोषखड्डे युक्त ग्राम स्पर्धा आयोजिल्याची माहिती, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी दिली. 


डॉ. भारूड म्हणाले, ''जिल्हास्तरावर गेल्या आठवड्यात हुतात्मा स्मृती मंदिरात घेण्यात आली. गटविकास अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक त्यास उपस्थित होते. पुणे विभागीय उपायुक्त चंद्रकांत गुडेवार व पर्यावरण अभ्यासक नंदकिशोर गांधी यांनी मार्गदर्शन केले होते. प्रत्येक तालुका व गाव पातळीवर त्याबाबत जनजागृती व प्लास्टिक संकलनाची मोहीम राबविण्यात येईल. 


कुटुंबस्तरावर प्लास्टिक व थर्माकोल वस्तू तत्काळ सार्वजनिक ठिकाणी संकलित करून त्याचा वापर न करण्याचा संकल्प करणे, घरातील कागदाचा पुनर्वापर करून पिशव्या व इतर वस्तू तयार करण्यासाठी प्रवृत्त करण्यात येईल. 


गटविकास अधिकाऱ्यांचा होणार गौरव 
जिल्ह्यात प्लास्टिक व थर्माकोल मुक्ती व शोषखड्डे युक्त गाव करणारे गटविकास अधिकारी यांचा २२ जुलै रोजी पंढरपूर येथे होणाऱ्या स्वच्छता दिंडीच्या समारोप समारंभात गौरव करण्यात येईल. प्लास्टिक मुक्तीच्या जनजागृतीसाठी कलापथक तसेच डिजिटल व्हॅनचा देखील उपयोग करण्यात येणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...