आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांगलीमध्ये कुंटणखान्यावर पोलीसांचा छापा, दोन तरूणींची केली सुटका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली- गोकुळनगर भागात सुरू असलेल्या एका कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा टाकून बांगलादेश आणि पश्‍चिम बंगालमधील दोन युवतींची सुटका केली. या प्रकरणी कुंटणखाना चालवणारी माहिला ज्योती कट्‌टीमणीला अटक करण्यात आली आहे. याबाबत अब्राहम शशिकांत हेगडे यांनी फिर्याद दिली आहे.


विश्रामबाग पोलिसांनी शुक्रवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास कुटणखान्यावर छापा टाकला. तेथून बांगलादेशातील ढाका येथील 25 वर्षीय तरूणी आणि पश्चिम बंगालच्य पारगणा येथईल 25 वर्षीय तरूणीची सुटका केली. तर कुटणखाना चालवणाऱ्या ज्योति कट्टीमणी या महिलेस पोलीसांनी अटक केली आहे.


पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, टिंबर परिसारातील गोकुळनगरात 27 वर्षीय ज्योती संतोष कट्टीमणी नावाची महिला कुटंणखाना चालवत असल्याची माहिती विश्रामबाग पोलिसांना मिळाली. पुणे येथील ऍडमिन फ्रीडम फर्म या सामाजिक संघटनेचे अब्राहम हेगडे यांनी विश्रामबाग पोलिसांमध्ये ही तक्रार दिली. सदर महिला पश्चिम बंगाल आणि बांगलादेशी तरूणींना घेऊन कुटणखाना चालवत होती. 

बातम्या आणखी आहेत...