आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंटणखान्यावर छापा; तिघांना अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - जुळे सोलापूर परिरातील श्रीनगर येथे एका घरामध्ये सुुरू असलेल्या कुंटणखान्यावर विजापूर नाका पोलिसांनी छापा टाकून तिघांना अटक केली. तसेच यामधील पीडित महिलेची सुटका केली.

 

जुळे सोलापूर येथे एका घरामध्ये ३३ वर्षीय महिलेस पैशाचे आमिष दाखवून वेश्या व्यवसाय करण्यास पाठवण्यात आले. पोलिसांना हे कळताच पोलिसांनी बनावट गिऱ्हाईक पाठवून त्या घरावर छापा टाकला. येथून घरमालक सुभाष धोंडिबा देवकते (वय ५०), आनंद महादेव कवठे (वय ३२, रा. मुस्ती), लक्ष्मी यशवंत सोनवणे (पाटील) ऊर्फ प्रयागबाई धोंडिबा देवकते (वय ७५,रा. तुळजापूर) यांना अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच या ठिकाणाहून पाच मोबाइल, पाचशे रुपये जप्त करण्यात आले.

 

बातम्या आणखी आहेत...