आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्याच्या अनेक भागात पाऊस, शेतकरी मशागतीत मग्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवेढा- बुधवारी व गुरुवारी पावसाने तालुक्यात दमदार हजेरी लावली. तालुक्यातील आंधळगाव,भाळवणी येथे विजेचे खांब कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला. पावसाने सुरुवात केल्याने बळीराजा सुखावला आहे. बुधवारच्या रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप तर गुरुवारी सकाळी दमदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे माळ भागातील खरिपाच्या पेरण्याला सुरुवात होणार आहे. ग्रामीण भागात प्यायला पाणी मिळत नसताना या पावसाने दिलासा मिळाला आहे. 


शेतकरी मशागत करून पावसाची वाट पाहत आहे. आता पाळी घालण्यासाठी सुरुवात केली जाईल. शेतकरी संपावर असताना पावसाने सुरुवात केल्याने बळीराजा सुखावला आहे. तालुक्यात पाणी फाउंडेशन, जलयुक्त शिवारची कामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. पाऊस चांगल्या पद्धतीने पडल्यास पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे. मरवडे, भालेवाडी, फटेवाडी, सिद्धापूर, मरवडे, सलगर, हुन्नर, नंदेश्वर, खोमनाळ, मारापूर येथे चांगली हजेरी लावली आहे. 


मंडलनिहाय पाऊस
मंगळवेढा-१४.५०, मरवडे-६,आंधळगाव-८, मारापूर-१७, भोसे- १८, बोराळे-९, हुलजंती- १७, एकूण १४.२१. 


माढा। परिसरात पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतकरी आनंदित झाला असून खरीप पेरणीच्या तयारीत गुंतला आहे. तालुक्यातील नऊ महसूल मंडळातील पर्जन्यमापक यंत्रावर ३२.२ मिमी पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. यापूर्वी तालुक्यात पावसाची संततधार झाली आहे. शिवारात सगळीकडे पावसामुळे पाणीच पाणी साचले होते. 


उत्तरमध्येही पाऊस 
रोहिणी नक्षत्राने जाता जाता उत्तर सोलापूर तालुक्याला चांगल्या पावसाची भेट दिली. तालुक्यात बुधवारी सायंकाळपासूनच पावसाला सुरवात झाली. सुरवातीला रिपरिप असणाऱ्या पावसाने पहाटे जोर धरला. सकाळी सहाच्या सुमारास वडाळा, नान्नज, रानमसले परिसरात जोरदार पाऊस झाला. गुळवंची, कोंडी परिसरात चांगला पाऊस झाल्याने भाजीपाला लागवडीला वेग येणार आहे. पेरणी पूर्व मशागतीलाही वेग येणार आहे. तालुक्यातील पहिल्या पावसाने पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून झालेल्या सीसीटी भरून गेल्या. 

बातम्या आणखी आहेत...