आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात २४ तासांत तब्बल ९५.३ मिलिमीटर पावसाची नोंद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- शहर आणि जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांत पावसाने दमदार हजेरी लावली. शहरात गुरुवारी सकाळी ८.३० ते शुक्रवारी सकाळी साडेआठपर्यंत तब्बल ९५.५ मि.मी. पावसाची नोंद हवामान विभागाकडे झाली आहे. पहाटे अडीच ते साडेपाचपर्यंत ४८.३ मि.मी. पाऊस झाला. 


जिल्ह्यात सरासरी ११.६० पाऊस झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे झाली आहे. सर्वाधिक पाऊस उत्तर सोलापूर तालुक्यात ३५.२४ मि.मी. पाऊस झाला आहे. जूनच्या पहिल्याच आठवड्यात जिल्ह्यातील अपेक्षित पावसाच्या १२९ टक्के म्हणजे ३५.११ मि.मी. पाऊस झाला आहे. मागील वर्षी २५ मि.मी. पाऊस झाला होता. 


तालुकानिहाय पाऊस 
उत्तर सोलापूर ३५.२४, दक्षिण सोलापूर १७.२९, बार्शी १२.३०, अक्कलकोट २२.५६, मोहोळ २०.१५, माढा २.४९, करमाळा ००, पंढरपूर ५.४४, सांगोला ०.४४, मंगळवेढा ११.७१, एकूण १२७.६५ मि.मी., सरासरी ११.६५ मि.मी. 

बातम्या आणखी आहेत...