आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामोहोळ (सोलापूर)- माझे तुझ्यावर प्रेम आहे, मी तुझाशी लग्न करणार आहे असे लग्नाचे अामिष दाखवून 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पोखरापूर येथील 21 वर्षीय युवकावर मोहोळ पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोखरापुर (ता. मोहोळ) येथील सहावीत शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या घराकडे जाण्याच्या उन्हाळेवस्ती रस्त्यावर अविराज मोहन नाईकनवरे (वय 21 रा. पोखरापुर) याचे घर आहे. त्याचे या मुलीच्या घरी नेहमी जाणे-येणे होते. या मुलीची व त्याची ओळख होती. तो तिला शाळेत सोडण्यासाठी जात होता. या दरम्यान माझे तुझ्यावर प्रेम आहे, तू मला आवडतेस, तुझ्या बरोबर मला लग्न करायचे आहे असे तो म्हणत होता. याबाबत अल्पवयीन पीडित मुलीने आईला सांगितले होते. त्यानंतर आईने अविराज याच्या घरातील लोकांना ही घटना सांगितली. मुलाला समज देण्यास सांगितले. तरी देखील अविराजच्या वागण्यात फरक पडला नाही. तो तिच्या मागे जात होता. नोव्हेंबर 2017 च्या पहिल्या आठवड्यात लग्नाचे आमिष दाखवून मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असतानाही पोखरापुर येथील विद्यालयाच्या पडक्या खोलीत नेऊन तिच्यावर अत्याचार केला. अशी फिर्याद पीडित मुलीच्या आईने मोहोळ पोलिसात दाखल केली आहे. तपास उपविभागीय पोलिस अधिकारी अभय डोंगरे करीत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.