आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रस्तावित विमानतळाची जबाबदारी राज्यावर; शिंदे यांच्या पत्रास केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचे उत्तर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी बोरामणी (ता. उत्तर सोलापूर) येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विकास करून विमानसेवा सुरू करण्याबाबत विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे मागणी केली अाहे, त्यावर प्रभू यांनी सकारात्मकता दाखवत विमानतळाची जबाबदारी राज्य सरकारची असल्याची म्हटले अाहे. 


महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी   आणि एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्यामध्ये नव्याने करार करणे अपेक्षित आहे, असे त्यांनी उत्तराच्या पत्रात म्हटले अाहे. केंद्रात आणि राज्यात सरकार बदलल्यानंतर विमानतळ रखडले. शिंदे यांनी बोरामणी विमानतळाचा विषय लावून धरला आणि त्यांनी थेट केंद्रीय हवाई वाहतुक मंत्री सुरेश प्रभू यांना पत्र लिहून विचारणा केली. त्यावर प्रभू यांनी २१ मे रोजी उत्तर देत सांगितले की महाराष्ट्र शासनाकडून दिरंगाई होत आहे. 

 

२३ जून २०१५ रोजी एक बैठक झाली. त्यामध्ये सोलापूरच्या बोरामणी विमानतळासाठी विशेष हेतू वाहन या प्रकल्पाअंतर्गत विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी बंगळुरू आणि हैदराबाद येथील विमानतळाप्रमाणे नव्याने करार करण्याच्या सूचना त्यावेळी देण्यात आल्या होत्या. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी आणि एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्यामध्ये नव्याने करार करणे अपेक्षित आहे. मात्र महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून अद्याप कसलीच कार्यवाही झालेली नाही. त्यामुळेच बोरामणी विमानतळाचा प्रश्न रखडला आहे, असे सुरेश प्रभू यांच्याकडून आलेल्या पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे. शिंदे यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला आहे. 

बातम्या आणखी आहेत...