आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायंकाळी पाचपर्यंत बाजार समितीचा निकाल; एसआरपी कॅम्प येथे सकाळी सुरू होणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सोलापूर बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीतील मतमोजणी मंगळवारी सकाळी आठला राज्य राखीव पोलिस दलाच्या सभागृहात होणार आहे. तिची तयारी पूर्ण झाली आहे. सायंकाळी ५ वाजेपर्यंत अंतिम निकाल जाहीर होणार असल्याची माहिती निवडणूक अधिकारी ज्योती पाटील यांनी दिली. अनुचित प्रकार रोखण्यासाठी पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. संचालक पदाच्या १८ जागांसाठी शेतकऱ्यांनी रविवारी मतदान केले. 


मतमोजणी ३२ टेबलवर होणार आहे. बोरामणी व होटगी गणाची मतमोजणी प्रत्येकी तीन टेबलवर होईल. नान्नज व हमाल-तोलार गणाची मतमोजणी एकाच टेबल होईल. त्यानंतर व्यापारी मतदारसंघाच्या मतांची मोजणी होईल. उर्वरित एका गणातील मतमोजणी दोन टेबलवर करण्यात येणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...