आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापुरातील तीन महिलांनी केली दावणगिरी मंदिरात चोरी, २० तोळे सोने जप्त

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- कर्नाटकातील दावणगिरी येथील एका मंदिरात सोन्याचे दागिने पळवताना तिघा महिलांना रंगेहात पकडण्यात अाले अाहे. त्या महिला सोलापुरातील असून, मागील चोरीच्या अनेक गुन्ह्यातील दागिने सोलापुरात विकल्याचे सांगितल्यामुळे कर्नाटक पोलिस सोलापुरात येऊन २० तोळे दागिने येथील सराफाकडून रिकव्हरी केल्याचे सांगण्यात अाले. 

 

उषा खांडेकर, मीना बजरंग जाधव, तिप्पव्वा लक्ष्मण जाधव (रा. सोलापूर) यांना अटक झाली असून, सध्या त्या तिघी कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात अाहेत. चौकशी त्यांनी सोलापुरात दागिने विकल्याचे सांगितल्यामुळे एक पथक अाले होते. शहर गुन्हे शाखेची मदत घेऊन सराफाकडून दागिने रिकव्हरी करून गेल्याचा दुजोरा शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिला. २७ फेब्रुवारी रोजी ही घटना दावणगिरी येथे घडली होती. मागील अाठ-दहा महिन्यांत या तिघांनी मिळून वीसहून अधिक गुन्हे केल्याची माहिती मिळाली अाहे. अजून तपास सुरू अाहे. 

बातम्या आणखी आहेत...