आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साेलापुरात ३० कामगार मित्रांनी सुरू केली रोटी बँक, जिल्हा रुग्णालयात दरराेज २०० गरजूंना मिळतेय अन्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सोलापुरातील सर्वोपचार शासकीय रुग्णालयात दररोज शेकडो रुग्ण दाखल होतात. हलाखीच्या अार्थिक आर्थिक परिस्थितीमुळे यापैकी काही रुग्णांना व त्यांच्या नातलगांना एक वेळच्या जेवणाची व्यवस्था करणे मुश्कील होते. अशा गरजू रुग्ण आणि नातेवाइकांपर्यंत एक वेळचे जेवण पोहोचवण्यासाठी शहरातील ३० कामगार मित्रांनी एकत्र येऊन रोटी बँकेचा उपक्रम सुरू केला. गेल्या वर्षभरापासून नियमित अन्नदान केले जात असून सुमारे २०० लोकांपर्यंत अन्न पोहोचवले जात आहे. परगावाहून आलेल्या गरजूंना याचा मोठा आधार मिळत आहे. ७ ऑगस्ट २०१७ रोजी संस्थापक जमीर खान पठाण यांनी या उपक्रमाची सुरुवात केली. गेल्या वर्षभर ही सेवा अखंड सुरू आहे. दररोज रात्री ७ ते ८ या वेळेत शासकीय रुग्णालयाबाहेर ए आणि बी ब्लॉकसमोर रोटी बँक व्हॅन नियमित उभी असते. सुमारे २०० ते २३० रुग्णांचे नातेवाईक या सेवेचा लाभ घेतात. 


अशी केली सुरुवात... 
शासकीय रुग्णालयात सोलापूर जिल्ह्यासह उस्मानाबाद, लातूर, बिदर, विजापूर, गुलबर्गा आदी भागातून येणाऱ्या रुग्ण आणि नातेवाईक यांची संख्या मोठी आहे. येथे येणारे बहुतेक रुग्ण व नातेवाईक गरीब असतात. उपचाराच्या खर्चाबरोबर राहणे व जेवणाचा खर्च करताना नातेवाइकांचे हाल होतात. काही जणांना एक वेळच्या जेवणाची व्यवस्था करणेही मुश्कील होते. ही गरज ओळखून जमीर पठाण व त्यांच्या ३० सहकाऱ्यांनी स्वखर्चातून हा उपक्रम सुरू केला. रोटी बँकेतील सर्व मंडळी कामगार वर्गातील आहे. पठाण हे गॅरेज मेकॅनिक आहेत तर उपाध्यक्ष सोमनाथ उपासे हे दूध टाकण्याचे काम करतात. सचिव जुबेर सय्यद, खजिनदार इलियास पटवेकर, अबुजर पीरजादे व इतर मंडळीही छोटी मोठी कामे करतात. सुरुवातीला या सर्व मंडळीनी स्वखर्चातून उपक्रम सुरू केला. अाता आता हळूहळू समाजातील दानशूर मंडळी मदतीसाठी पुढे येत आहेत. 


दाेन वेळचे भाेजन देण्याचा संकल्प 
अलीकडच्या काळातील समाजातील अनेक जण वाढदिवसाचा खर्च टाळून या उपक्रमाला मदत देत आहेत. समाजातील दानशूर मंडळीही आपला या उपक्रमात सहभागी होऊन हातभार लावावा. शिवाय लग्न आणि रिसेप्शन कार्यक्रमातील शिल्लक अन्न रोटी बँक घेऊन गरीब वस्तीत वाटतात. मदतीसाठी ८४२१७६९३३४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पठाण यांनी केले. यापुढे दरराेज दाेन वेळचे जेवण पुरवण्याचा मानस असल्याचे पठाण म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...