आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करमाळा विधानसभा मतदारसंघातूनच निवडणूक लढवणार : संजय शिंदे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुर्डुवाडी- आगामी विधानसभा निवडणूक करमाळा मतदारसंघातूनच लढवणार असल्याची यापूर्वीच घोषणा केली आहे. त्यात कोणताही बदल होणार नाही. या मतदारसंघातूनच मैदानात उतरणार आहे. सोशल माध्यमात अफवा पसरवल्या जात असल्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी 'दिव्य मराठी'शी बोलताना स्पष्ट केले. 


१२ जून रोजी येथील के. एन. भिसे महाविद्यालयात कै. के. एन. भिसे यांच्या पुतळा अनावरण समारंभात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी ज्येष्ठांनी विश्रांती घ्यावी, तेथे तरुणांना संधी द्यावी, असे व्यक्तव्य केले होते. त्या दिवसापासून सोशल माध्यमात संजय शिंदे हे माढा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होत आहे. त्यावर संजय शिंदे यांनी करमाळा विधानसभा मतदारसंघातूनच निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच माढा विधानसभा मतदारसंघातून कधीही निवडणूक लढवणार नसल्याचे त्यांनी म्हटले. विरोधक या अफवा पसरवत असल्याचा त्यांनी आरोप केला. 


काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुर्डुवाडी येथील हल्लाबोल आंदोलनाच्या सभेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करमाळा मतदारसंघातून रश्मी बागल निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली होती. यामुळे बागल गटाच्या समर्थकांत नवचैतन्य निर्माण झाले होते. त्यानंतर लगेच जिल्हा परिषद अध्यक्ष शिंदे यांनीही याच ठिकाणाहून निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. 

बातम्या आणखी आहेत...