आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिष्यवृत्तीत अपहार : सोलापूर जिल्ह्यातील 17 संस्थांवर गुन्हा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- सामाजिक न्याय आदिवासी विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती देण्यात येते. मात्र राज्यातील अनेक संस्थांनी या रकमेचा अपहार केला. या संपूर्ण गैरव्यवहाराची विशेष चौकशी पथकाने चौकशी केली असता राज्यातील १७०४ संस्थांनी १८२६.८७ कोटींचा गैरव्यवहार केल्याचे समोर आले आहे. यापैकी आदिवासी विकास विभागातील दोन आणि सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाकडील ६८ अशा ७० संस्थांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यात १७ संस्था या सोलापूर जिल्ह्यातील आहेत. या संस्थांकडून २८ कोटी ३० लाख वसूल करण्यात येतील. 


हसन मुश्रीफ, अजित पवार, शशिकांत शिंदे, बच्चू कडू आदी ३१ सदस्यांनी या गैरव्यवहाराबाबतचा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी उत्तर देताना गैरव्यवहाराची सविस्तर माहिती दिली आहे. विशेष चौकशी पथकाच्या अहवालातील एकूण १७०४ संस्थांच्या लेखा परीक्षणाच्या अनुषंगाने विश्लेषण पडताळणी करण्याची कार्यवाही समाजकल्याण आयुक्त पुणे यांच्यामार्फत सुरू असून, अनियमिततेच्या १८२६.८७ कोटी रकमेपैकी आतापर्यंत ९६.१६ कोटी रुपये वसूल केले असून कोषागारात भरण्यात आले आहेत. ६८५.४१ कोटी इतक्या अग्रिम रकमेचे समायोजन करण्यात आले असून, ७० संस्थांवर गुन्हे नोंद करून २८ कोटी ३० लाख रुपये वसूल करण्याची कार्यवाही सहायक आयुक्तांमार्फत सुरू आहे. काही संस्थांनी न्यायालयात धाव घेतल्याने औरंगाबाद आणि नागपूर खंडपीठाने स्थगिती आदेश दिल्याने गुन्हे दाखल केले नसल्याचेही उत्तरात स्पष्ट करण्यात आले आहे. बीड जिल्ह्यातील १२ आणि पुणे जिल्ह्यातील संस्थांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 


याप्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी उत्तर देताना गैरव्यवहाराची सविस्तर माहिती दिली आहे. विशेष चौकशी पथकाच्या अहवालातील एकूण १७०४ संस्थांच्या लेखा परीक्षणाच्या अनुषंगाने विश्लेषण पडताळणी करण्याची कार्यवाही समाजकल्याण आयुक्त पुणे यांच्यामार्फत सुरू असून, अनियमिततेच्या १८२६.८७ कोटी रकमेपैकी आतापर्यंत ९६.१६ कोटी रुपये वसूल केले असून कोषागारात भरण्यात आले आहेत. ६८५.४१ कोटी इतक्या अग्रिम रकमेचे समायोजन करण्यात आले असून, ७० संस्थांवर गुन्हे नोंद करून २८ कोटी ३० लाख रुपये वसूल करण्याची कार्यवाही सहायक आयुक्तांमार्फत सुरू आहे. काही संस्थांनी न्यायालयात धाव घेतल्याने औरंगाबाद आणि नागपूर खंडपीठाने स्थगिती आदेश दिल्याने गुन्हे दाखल केले नसल्याचेही उत्तरात स्पष्ट करण्यात आले आहे. बीड जिल्ह्यातील १२ आणि पुणे जिल्ह्यातील संस्थांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 


अन्य संस्था 
स्वामी विवेकानंद महाविद्यालय जळकोट रोड उदगीर, धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज उदगीर, मॉर्डन कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स, विद्युतनगर नांदेड, सावित्रीबाई फुले विज्ञान बीसीए महाविद्यालय वसमत, हिंगोली, अनाथ वृद्ध आनंद आश्रम संस्था, धुळे संचालित निर्मल कॉलेज, शहादा, नंदूरबार, अॅनिमा अॅनिमेशन अॅकॅडमी धडगाव, नंदूरबार,राजश्री शाहू तंत्रनिकेतन विद्यालय कळंब, उस्मनाबाद, पूजा नर्सिंग स्कूल, परळी, बीड, स्व. इंद्रा गांधी नर्सिंग स्कूल पाटोदा, बीड, डॉ. डी, एम. धोंडे स्कूल ऑफ नर्सिंग, अष्टी बीड, जिजामाता नर्सिंग स्कूल माजलगाव बीड, ज्ञानदीप कॉलेज आयटीआय अॅन्ड अॅग्रीकल्चर, अंबाजोगाई बीड, माणिकदादा कदम पाटील संगणक व्यवस्थापन शास्त्र महाविद्यालय, तुळजापूर, उस्मानाबाद आदी संस्थांचाही यादीत समावेश आहे. 


या आहेत संस्था 
सहाराइन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग स्कूल, अकलूज, धन्वंतरी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग स्कूल,अकलूज, अश्विनी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग सोलापूर, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ कॉलेज ऑफ नर्सिंग बार्शी, श्री सिध्देश्वर इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग होटगी, बिनीत मेडिकल फाउंडेशन संचालित बिनीत नर्सिंग इन्स्टिट्यूट, सोलापूर, वसंतदादा काळे मेडिकल फाउंडेशन संचालित जनकल्याण इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन, पंढरपूर, धनश्री इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग, कुर्डुवाडी, मल्लिकार्जुन हेल्थ केअर रिसर्च सेंटर यशोधरा नर्सिंग इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग सोलापूर, धनराजगिरी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग स्कूल पार्क चौक, , एस. पी. इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग स्कूल, सोलापूर, मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालय नर्सिंग ट्रेनिंग स्कूल, पाच्छा पेठ सोलापूर, श्रीमती कमलाबेन पटेल इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन, कुंभारी, विजयसिंह मोहिते पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग अकलूज, सरदारबी इन्स्टिट्यूटऑफ नर्सिंग स्कूल, मोहोळ, राजमाता जिजाऊ नर्सिंग स्कूल, पंढरपूर, भक्ती इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग, पंढरपूर.

बातम्या आणखी आहेत...