आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारंबा-बार्शी रोडवर टमटम उलटून शाळकरी मुलगा ठार; शेताला जाताना दुर्घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- काकांची टमटम उलटून कारंब्याचा एक शाळकरी मुलगा ठार झाला. शेताकडे जाताना बार्शी-कारंबा रोडवर ही दुर्घटना घडली. चालकासह इतर दोन मुले किरकोळ जखमी झाली. फेरोज पठाण असे मृत मुलाचे नाव आहे. तालुका पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. 


अलीम लतीफ पठाण हे टमटम घेऊन सोमवारी सायंकाळी शेताकडे निघाले. सोबत फेरोज सलीम पठाण (वय १०), अरमान तकदीर पठाण, इरफान सलीम पठाण ही मुले होती. शेताकडे जाताना बार्शी-कारंबा रोडवर टमटम उलटला. सर्वजण खाली पडले. मदतीसाठी रस्त्यावरील लोक धावून आले. फेरोजच्या डोक्याला दगडांचा मार लागल्याने रक्तस्राव झाला. त्याला लगेच सोलापूरच्या मार्कंडेय रुग्णालयात आणण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. इतर दोघांना किरकोळ जखमा झाल्या. 


आईचा हंबरडा 
सलीम पठाण यांना दोन अपत्ये. एक इरफान तर दुसरा फेरोज. फेरोज हा मोठा मुलगा. तो बोलका असल्यामुळे सर्वांचा लाडका. कारंबा येथील जिल्हा परिषद शाळेत चौथीत शिकत होता. त्याच्या मृत्यूने कारंबा गावात हळहळ व्यक्त होत आहे. फेरोजच्या आईने तर हंबरडाच फोडला. 

बातम्या आणखी आहेत...