आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मी तिसऱ्या आघाडीचा विषय बोललोच नाही शरद पवार म्हणाले, शिवसेनेला आॅफर नाहीच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माढा - पुण्याच्या सभेत मी तिसऱ्या आघाडीचा विषय बोललोच नाही. शक्य तिथे समविचारी पक्षांनी एकत्र आल्यास भाजपला पर्याय देता येईल, असे मी म्हणालो होतो. तसेच शिवसेनेला आॅफर द्यायचा किंवा त्यांना तिसऱ्या आघाडीत येण्याचे निमंत्रण द्यायचा विषयच कुठे येतो, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले. मंगळवारी कुर्डुवाडी येथे एका कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.


माेदीविराेधी अाघाडीत शिवसेनेला साेबत घेणार का? या प्रश्नावर ते म्हणाले, ‘अशी काही चर्चा झाली नाही. तशी चिन्हे दिसत नाहीत. शेकाप, रिपाइं (कवाडे गट) यांना सोबत घेऊन काही करता येईल का, इतकाच सध्या आमचा विचार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने इतर पक्षांच्या मदतीने गोंदियात मोठे यश मिळवले. पालघरमध्येही काही लोकांनी समंजसपणाची भूमिका घेतली असती तर वेगळा निकाल पाहायला मिळाला असता, असा टाेला त्यांनी काँग्रेसला लगावला.


‘ती’ तर जन्मजात प्रवृत्ती 

 पवार म्हणाले, मुस्लिमांना दहशतवादी आणि आता मागासवर्गीयांना नक्षलवादी म्हणणाऱ्यांची एक जन्मजात प्रवृत्ती आहे. त्यामुळे मागासवर्गीय व अल्पसंख्याकांनी भाजपच्या  विरोधात लढा देण्यासाठी एकत्रित येण्याची गरज निर्माण झाली अाहे.त्याकरिता पुढाकार घ्यावा, असे आवाहनही शरद पवार यांनी केले.

 

मुख्यमंत्री पडले भारी

उस्मानाबाद-बीड-लातूर विधान परिषद निवडणुकीतील राष्ट्रवादीच्या पराभवाबद्दल पवार म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या सत्तेची ताकद आमच्या उमेदवारावर भारी पडली. भिडे गुुरुजींना प्रसारमाध्यमांसह नागरिकांनी फार महत्त्व देऊ नये, असे त्यांनी संभाजी भिडे यांचे नाव न घेता म्हटले.

बातम्या आणखी आहेत...