आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिद्धेश्वर गड्डायात्रेस तैलाभिषेकाने सुरुवात; मंजूळ आवाज, भक्तिगीते व हलग्यांच्या कडकडाट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सिद्धेश्वर गड्डायात्रेस शुक्रवारी अतिशय उत्साही आणि भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. बोला बोला एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्र, सिद्धेश्वर महाराज की जय असा जयघोष करीत, सनई चौघड्यांचा मंजूळ आवाज, भक्तिगीते व हलग्यांच्या कडकडाट होता.

 

पांढराशुभ्र बाराबंदीचा पोषाख परिधान केलेल्या शेकडो भक्तांच्या उपस्थितीत सिद्धरामेश्वर महाराजांनी स्थापन केलेल्या ६८ लिंगांना तैलाभिषेक (यण्णीमज्जन) झाला. नंदीध्वज मिरवणुकीने तैलाभिषेक करण्यात आला. मल्लिकार्जुन मंदिराजवळील हिरेहब्बू मठात सकाळी मानाच्या पहिल्या व दुसऱ्या नंदीध्वजांची मानकरी शिवानंद हिरेहब्बू, राजशेखर हिरेहब्बू, राजशेखर देशमुख, सुदेश देशमुख यांच्यासह पालकमंत्री विजयकुमार देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, उज्ज्वलाताई शिंदे, आमदार प्रणिती शिंदे, स्मृती शिंदे, देवस्थान कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली.


नंदीध्वजाचे मुस्लिम समाजाने केले स्वागत
ग्रामदैवत सिध्दरामेश्वर यांचे सात नंदीध्वज हे धर्मनिरपेक्षतेचे प्रतीक आहे. याला शोभेले असे चित्र शुक्रवारी दत्त चौकात दिसून आले. मुस्लिम तरुणांनी सर्व मानकरी व नंदीध्वजांचे पुष्पहार घालून स्वागत केले.


अक्षता सोहळ्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज
सिद्धेश्वर मंदिर परिसरातील संमती कट्याजवळ शनिवारी दुपारी अक्षता सोहळा होणार अाहे. सोलापूरसह कर्नाटक, अांध्र प्रदेशातून शेकडो भाविक येतात. पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला अाहे.

 

बातम्या आणखी आहेत...